Home /News /entertainment /

...तर मुव्ही माफिया काय करू शकतात याची कल्पना करू शकतो, गोळीबार प्रकरणानंतर कंगनाची प्रतिक्रिया

...तर मुव्ही माफिया काय करू शकतात याची कल्पना करू शकतो, गोळीबार प्रकरणानंतर कंगनाची प्रतिक्रिया

कंगना रणौतने तिच्या घराबाहेर गोळीबार ऐकल्याची माहिती दिल्यानंतर तिच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यानंतर कंगनाच्या टीमने एक ट्वीट केले आहे. यामध्ये देखील कंगनाने 'बॉलिवूडमधील मुव्ही माफिया'वर टीका केली आहे.

    मुंबई, 02 ऑगस्ट : अभिनेका सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने गेल्या दीड महिन्यात विविध आरोप केले आहेत. तिने बॉलिवूडमधील नेपोटिझम, आउटसाइडर्सना दिली जाणारी वागणूक यासंदर्भात वेळोवेळी भाष्य केले आहे. दरम्यान कंगनाच्या घराजवळ शुक्रवारी रात्री गोळीबाराचा आवाज झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर अभिनेत्रीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी थेट आरोप करत आवाज उठवल्यावरून मला धमकवण्यासाठी हे कृत्य असू शकतं, असं कंगनाचं म्हणणं आहे. यासंदर्भात कंगनाच्या टीमने आणखी एक ट्वीट केले आहे. त्यांनी काही वर्तमानपत्रामधील मथळे शेअर करत हे ट्वीट केले आहे. यामध्ये देखील कंगनाने 'बॉलिवूडमधील मुव्ही माफिया'वर टीका केली आहे. (हे वाचा-सुशांतच्या EX-मॅनेजरच्या घरी पोहोचले बिहार पोलीस,अभिनेत्याआधी संपवलं होत जीवन) कंगनाने या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'जर मुव्ही माफिया एखाद्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या प्रकरणात फौजदारी खटला दाखल करू शकतात, जर ते त्यांच्या राजकीय नेपोटिझमसोबत माफिया गुंडाबरोबर मध्यरात्री तिच्या घराबाहेर गोळीबार करू शकतात तर मग ते बिहारच्या राजपूत मुलाबरोबर काय करू शकतात याची कल्पना आपण करू शकतो'. कंगनाच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे घाबरून तिचे कुटुंबीय सुशांतच्या मृत्यूबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा दबाव आणत असल्याचा दावा देखील कंगना रणौत करत आहे. कंगनाच्या मनाली इथल्या घराजवळ रात्री गोळीबाराचा आवाज झाला होता, त्यानंतर कुल्लू पोलिसांनी लगेचच कंगनाच्या घराकडे धाव घेतली आणि सुरक्षा पुरवली आहे. (हे वाचा-...आणि म्हणून मी सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते,अंकिताचं स्पष्टीकरण) या प्रकाराबद्दल बोलतना कंगना रणौत म्हणाली की, "काल रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. मी तेव्हा बेडरूममध्ये होते. मला पहिल्यांदा फटाक्याचा आवाज वाटला. पण त्यानंतर लगेच दुसरा गनशॉटचा आवाज आला. माझ्या सुरक्षा व्यवस्थापकाला लगेच मी अलर्ट केलं. त्यालाही सुरुवातीला मुलांनी फटाके उडवले असतील असं वाटलं. त्यानं आसपास चौकशी केली पण मुलं दिसली नाहीत." कंगनाने या घटनेसंदर्भात सविस्तर निवेदनच प्रसिद्ध केलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Kangana ranaut, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या