जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...आणि म्हणून मी सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते, अंकिताने दिलं स्पष्टीकरण

...आणि म्हणून मी सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते, अंकिताने दिलं स्पष्टीकरण

सुशांत कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही. त्यांनी यामागे कोणावरही आरोप केला नसला तरी या प्रकरणात कडक तपासाची मागणी केली आहे.

सुशांत कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही. त्यांनी यामागे कोणावरही आरोप केला नसला तरी या प्रकरणात कडक तपासाची मागणी केली आहे.

‘सुशांत एखाद्या गोष्टीबाबत नाराज होऊ शकतो पण तो नैराश्यात जाणे शक्य नाही’, अशी ठाम प्रतिक्रिया त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने काही दिवसांपूर्वी दिली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) अनेक दावे गेल्या काही दिवसात केले जात आहेत. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी (KK Singh) एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याासाठी उभी राहिलेली अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने देखील काही दिवसापूर्वी मौन सोडले आहे. या घटनेचा तिच्यावर किती मोठा परिणाम झाला आहे, याबाबत तिने प्रतिक्रिया दिल्यात. त्याच्या मृत्यूनंतर व्हायरल फोटो आणि त्याच्यावर झालेले अंत्यसंस्कार याबाबत तिने अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली आहे. एका खाजगी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकिताने सुशांतबाबतच्या तिच्या या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी अंकिता म्हणाली की, तिचे सुशांतच्या कुटुंबीयांबरोबर खूप चांगले संबध आहेत. यावेळी ती म्हणाली की, तिने सुशांतचे अंत्यसंस्कारावेळी यासाठी उपस्थित नव्हती कारण ती अशा अवस्थेत सुशांतला पाहू शकणार नव्हती. हा तिचा स्वत:चा निर्णय होता असल्याची प्रतिक्रिया अंकिताने दिली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकिता असे देखील म्हणाली की, सुशांतच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेले फोटो देखील तिला काहींनी पाठवले होते. ते खूपच धक्कादायक होते. (हे वाचा- सुशांतच्या थेरपिस्टच्या वक्तव्यानं आत्महत्या प्रकरणाला नवं वळण,रियाची घेतली बाजू ) सुशांतबाबत तिने याआधी काही वक्तव्य केली आहेत. ‘सुशांत एखाद्या गोष्टीबाबत नाराज होऊ शकतो पण तो नैराश्यात जाणे शक्य नाही’, असे ठाम मत अंकिताने व्यक्त केले आहे. सुशा्ंत आणि अंकिता जवळपास 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. करिअरची सुरुवात देखील दोघांनी एकाच काळात केली होती. सध्या याप्रकरणी अधिक तपास करण्याआधी बिहार पोलीस दिशा सॅलियनच्या (Disha Salian) घरी पोहोचले आहेत. दिशा सुशांतची पूर्व-मॅनेजर आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी दिशाने देखील आत्महत्या केली होती. काही दिवसांच्या कालावधीमध्ये झालेल्या या दोन्ही घटनांमुळे बॉलिवूड हादरले होते. (हे वाचा- SSR Death Case: ‘प्रकरण दडपण्यासाठी ठाकरे सरकारवर माफिया आणि बॉलिवूडचा दबाव' ) दरम्यान सध्या बिहार पोलीस देखील सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेचा स्वतंत्रपणे तपास बिहार पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी महाराष्ट्र-बिहारमध्ये राजकारण तापल्याचे देखील दिसून येत आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण दडपण्यासाठी ठाकरे सरकारवर बॉलिवूड आणि माफियांचा दबाव आहे असा आरोप त्यांनी केला. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस हे चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे. जर कुणाकडे काही पुरावे असेल तर त्यांनी ते मुंबई पोलिसांकडे सोपवावे, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात