Home /News /national /

मुंबई सोडून जात आहेत डायमंड कंपन्या, सुरत ठरतंय आकर्षणाचं ठिकाणं

मुंबई सोडून जात आहेत डायमंड कंपन्या, सुरत ठरतंय आकर्षणाचं ठिकाणं

कोरोना काळात आतापर्यंत मुंबईतील जवळपास 70 डायमंड कंपन्या सुरतमध्ये आल्या आहेत. तर तीन ते पाच वर्षात जवळपास 500 हून अधिक डायमंड कंपन्या मुंबईतून सुरतमध्ये येण्याची शक्यता आहे.

  सुरत, 21 फेब्रुवारी : गुजरातच्या खजोदमध्ये तयार होत असलेल्या सर्वात मोठ्या 'डायमंड बुर्स'ने गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतचा चेहराच बदलला आहे. पुढच्या वर्षी जून 2022 पासून येथे हिरा व्यवसायाची सुरुवात होणार आहे. 6 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात 2400 कोटी रुपये खर्चून हे बुर्स तयार केलं जात आहे. 2021 च्या एप्रिल-मे महिन्यापासून येथे ऑफिसेससाठी पजेशन देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. डायमंड बुर्स सुरू होण्याची तारीख जशी जवळ येत आहे, तसं मुंबईतून मोठे हिरा व्यापारी मोठ्या प्रमाणात सुरतमध्ये येत आहेत. एका अंदाजानुसार, सुरतमध्ये प्रॉपर्टीच्या चौकशीसाठी मुंबईतील व्यापाऱ्यांचे दर आठवड्याला एक हजारहून अधिक कॉल येत आहेत. स्कायलँड ग्रुपचे बिल्डर पीयुष शेट यांनी सांगितलं की, सुरतमध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी दोन आठवड्यांपासून वेटिंग आहे. तसंच येथे व्यापाऱ्यांना मुंबईसारखं वातावरण आणि सुविधा मिळाव्यात हाच आमचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोना काळात आतापर्यंत मुंबईतील जवळपास 70 डायमंड कंपन्या सुरतमध्ये आल्या आहेत. तर तीन ते पाच वर्षात जवळपास 500 हून अधिक डायमंड कंपन्या मुंबईतून सुरतमध्ये येण्याची शक्यता आहे. सुरतमध्ये डायमंड बुर्ससह इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि बुलेट ट्रेनच्या निर्मितीमुळे, डायमंड कंपन्या मुंबईतून व्यापार बंद करून सुरतमध्ये स्थाईक होत आहेत.

  (वाचा - विमानाला अचानक आग; पायलटने सेफ लँडिंग करत वाचवला 231 प्रवाशांचा जीव, पाहा VIDEO)

  सुरतच्या अधिकतर डायमंड कंपन्यांचं कॉर्पोरेट हेड ऑफिस बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. तसंच बोरिवली, मालाड, गोरेगाव, दहिसरसारख्या भागात डायमंड कंपन्यांचे युनिट्स आहेत. डायमंड बुर्सचे उपाध्यक्ष आशिष दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2022 पर्यंत व्यवसाय सुरू होईल. बुर्सच्या जवळच मेट्रो स्टेशन तयार होत आहे. बुर्स कँपसमध्ये एकाच वेळी 50 हजार कर्मचारी काम करू शकतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Diamond, Mumbai, Surat

  पुढील बातम्या