वॉशिंग्टन, 21 फेब्रुवारी : रविवारी अमेरिकेत मोठा विमान अपघात टळला आहे. डेनवरहून होनोलुलु जाणारं बोइंग 777 विमानाच्या इंजिनमध्ये उड्डाणाच्या काही वेळातच आग लागली. विमानाच्या इंजिनमध्ये ज्यावेळी आग लागली त्यावेळी विमान 15 फूट उंचीवर होतं. परंतु पायलटच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला आहे. वैमानिकाने त्वरित कंट्रोल स्टेशनमध्ये मेसेज करून पुन्हा डेनवरमध्ये विमानाचं लँडिंग केलं. या विमानात एकूण 231 पॅसेंजर्स आणि 10 क्रू मेंबर्स होते. या घटनेच्या तपासणीसाठी नॅशनल ट्रान्सपोर्ट सिक्योरिटी बोर्डने (NTSB) एक टीम तयार केली आहे. विमानाचा मलबा मोठ्या भागात, मोठ्या प्रमाणात पसरला आहे. पोलिसांनी लोकांना या मलब्याला हात न लावण्याचं, तसंच त्या भागात न फिरण्याचंही आवाहन केलं आहे. विमानाच्या इंजिनाला आग लागल्यानंतर विमानात एकच हळबळ उडाली. परंतु पायलटने मोठ्या हिंमतीने या सगळ्याचा सामना केला. तसंच सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एका प्रवाशाने जळत्या इंजिनाचा व्हिडीओ काढला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
(वाचा - कोरोना लसीसाठी काहीही! दोघींनी लस मिळवण्यासाठी केलं असं काही की सगळेच चक्रावले )
बोइंग 777 हे विमान 26 वर्ष जुनं आहे. यात दोन प्रॅट अँड व्हिटनी PW4000 इंजिन लावण्यात आले होते. फेब्रुवारी 2018 मध्येही बोइंग 777 च्या एका जुन्या विमानाचं इंजिन फेल झालं होतं. त्यावेळी देखील अतिशय कमी वेळात सुरक्षित लँडिंग करण्यात आली होती.