सूरत, 28 ऑक्टोबर: बऱ्याचदा आपण लहान मुलांना विनाकारण मारहाण झाल्याच्या घटना पाहतो. मोठ्या माणसांकडून या निष्पाप मुलांना मारहाण होत असते. अशीच एक घटना सूरतमध्ये (Surat) घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आलं आहे. एका 12 वर्षाच्या (12-year-old boy) मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका सोसायटीत एक मुलगा आपल्या कुत्र्याला फिरण्यासाठी बाहेर घेऊन आला होता. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती आपल्या घरातून बाहेर येतो आणि त्या मुलाकडे जातो.
सूरतमध्ये 12 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण pic.twitter.com/4ucBT4pvoe
— News18Lokmat (@News18lokmat) October 28, 2021
पुढे त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी बोलत असतो. अचानक तो व्यक्ती त्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात करतो. त्याच दरम्यान अन्य आजूबाजूचे मुलं त्याच्या जवळ येतात आणि आरडाओरड करतात. हेही वाचा- दरीत कोसळली बस, 11 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर मारहाण झालेल्या मुलाचे मित्रमैत्रिणी त्याच्या आईला बोलावून घेतात. आई लगेचच तिथे पोहोचते आणि ती त्या व्यक्तीला जाब विचारते. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोसायटीत कुत्र्याला फिरवण्यास त्या व्यक्तीचा विरोध होता. त्याचाच राग मनात ठेवून त्यानं त्या 12 वर्षांच्या मुलाला मारहाण केली. हेही वाचा- रात्रभर दुखत होता कान, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सरकली महिलेच्या पायाखालची जमीन मारहाण झालेल्या मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.