मराठी बातम्या /बातम्या /Viral /रात्रभर वाटतं होतं अस्वस्थ, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं... कानात शिरलाय कोळी

रात्रभर वाटतं होतं अस्वस्थ, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं... कानात शिरलाय कोळी

 अगदी साध्यात साधं म्हणजे जर दात थोडासा दुखायला लागला तर आपल्याला सहन होत नाही. संपूर्ण दिवस किंवा रात्र अस्वस्थ जाते.

अगदी साध्यात साधं म्हणजे जर दात थोडासा दुखायला लागला तर आपल्याला सहन होत नाही. संपूर्ण दिवस किंवा रात्र अस्वस्थ जाते.

अगदी साध्यात साधं म्हणजे जर दात थोडासा दुखायला लागला तर आपल्याला सहन होत नाही. संपूर्ण दिवस किंवा रात्र अस्वस्थ जाते.

चीन, 28 ऑक्टोबर: आपल्याला सुखी जीवनाची इतकी सवय झाली आहे की त्यात थोडा जरी बदल झाला तरीही तो आपल्याला सहन होत नाही. तसंच शरीराचंही आहे आपलं शरीर म्हणजे एक मोठं अजब यंत्र आहे. त्यात दररोज चाललेल्या अनेक प्रक्रियांबद्दल अचूक माहिती आजही आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. त्याचा कार्यकारणभावही आपल्याला माहीत नाही. पण छोटी गोष्ट आपल्या एवढ्या मोठ्या शरीराला वेठीला धरू शकते. अगदी साध्यात साधं म्हणजे जर दात थोडासा दुखायला लागला तर आपल्याला सहन होत नाही. संपूर्ण दिवस किंवा रात्र अस्वस्थ जाते. जोपर्यंत पेनकीलर घेत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही.

आणखी उदाहरण द्यायचं झालं तर कानात पाण्याचा थेंब गेला तरीही आपल्याला अस्वस्थ होतं. अंघोळ करताकरता न कळत पाण्याचा एखादा थेंब कानात जातो आणि कानाला दडा बसतो. त्यानंतर आपण मान डावी-उजवीकडे वळवून तो दडा काढण्याचा प्रयत्न करतो पण तो दिवसभर राहिला तर आपल्याला दिवसभर कमी ऐकू येतं आणि अस्वस्थ वाटत राहतं. हे सगळं सांगण्याचं कारण चीनमधील यी नावाच्या एका महिलेच्या कानात एक कोळी गेला होता आणि तो रात्रभर तिच्या कानातच होता. आज तक नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा-  एका पालीची दहशत! भीतीने काम सोडून पळाले कर्मचारी; अख्खं ऑफिस रिकामं झालं

 चीनमधील झुजोऊ प्रांतात राहणाऱ्या यी या महिलेला 17 ऑक्टोबरला आपल्या कानात दुखत असल्याचं जाणवलं. संपूर्ण रात्रभर तिला प्रचंड त्रास झाला. सुरुवातीला तिला वाटलं दडा बसला असेल पण संपूर्ण रात्र हा त्रास झाल्यानंतर मात्र तिने हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी कॅमेऱ्याच्या मदतीने तिच्या कानात पाहिलं तर त्यांना तिथं एक कोळी असल्याचं दिसलं. त्यांनी यी हिला सांगितलं की, तुमच्या कानात एक छोटा जिवंत कोळी आहे आणि संपूर्ण रात्र तो तुमच्या कानातच होता.

यी म्हणाली,‘ मी काल रात्री बाहेर गेले होते. मला कानात काहीतरी आहे असं वाटलं. पहिल्यांदा मला वाटलं की पाण्यामुळे दडा बसला असेल पण नंतर त्याचा त्रास प्रचंड झाला. मी रात्रभर अस्वस्थच होते. मला कानात काहीतरी सतत वाजतंय असंच वाटत होतं. त्यामुळे खूप त्रास होत होता. कोळी आत फिरत होता त्यामुळे खाज पण सुटली होती. सकाळी मात्र मी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.’

हेही वाचा-  पार्टीसाठी जाताना Eyes Lashes लावणं पडलं महागात, तरुणीची अशी झाली अवस्था; अनेक दिवसांपर्यंत दिसणंच झालं बंद

 स्थानिक मीडिया हाऊस बीजिंग न्यूजने सांगितलं की, डॉक्टरांनी यीच्या कानातील टॅम्पॅनिक मेमरेनवर कोळी असल्याचं पाहिलं आणि इलेक्ट्रिक ऑटोस्कोपचा वापर करून त्या कोळ्याला यीच्या कानातून यशस्वीपणे बाहेर काढलं. त्यानंतर यीचा त्रास कमी झाला.

अशा विचित्र घटना जगभर घडत असतात. सावधपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही श्रेयस्कर.

First published:

Tags: China