• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • जम्मू काश्मीरमध्ये दरीत कोसळली बस, 11 जणांचा जागीच मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये दरीत कोसळली बस, 11 जणांचा जागीच मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir Accident) एका बसचा (Bus) भीषण रस्ता अपघात (Horrible Road Accident) झाला आहे.

 • Share this:
  श्रीनगर, 28 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir Accident) एका बसचा (Bus) भीषण रस्ता अपघात (Horrible Road Accident) झाला आहे. थाथरीहून डोडाकडे जाणारी मिनी बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. आता रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अतिरिक्त एसपी डोडा यांनी सांगितलं की, बचावकार्य सध्या सुरू आहे. या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे थाथरीजवळ झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नुकतंच डीसी डोडा विकास शर्मा यांच्याशी बोलणं झालं आहे. जखमींना जीएमसी डोडा येथे घेऊन जात आहे. यापुढे जी काही मदत लागेल ती करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केलं शोक जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीशोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, 'ही घटना अत्यंत दुख:त आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात-लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. पुढे त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, PMNRF च्यावतीने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत दिली जाईल. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल. कशी घडली घटना बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे बस दरीत कोसळली. चिनाब नदीच्या पात्राजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर आहे. मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: