बंगळुरू 27 जुलै : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याचे (BS Yediyurappa's Resignation) पडसाद राजकरणाशिवाय जनतेवरही उमटल्याचं दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चामराजनगरच्या एका युवकानं येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे आत्महत्या केली (Yediyurappa's Supporter Commits Suicide) आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि युवकाच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. येडियुरप्पा यांनीही युवकाच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केलं आहे.
कर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, चर्चांना उधाण
येडियुरप्पा यांनी 35 वर्षीय रविच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केलं आहे. कुटुंबीयांचं सांत्वन करत त्यांनी कन्नडमध्ये ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलं, की माझ्यासाठी ही बातमी अत्यंत दुःखद आहे, की रविनं माझ्या राजीनाम्यामुळे आत्महत्या केली. राजकारणात चढउतार येत असतात. मात्र, म्हणून कोणीही आपलं आयुष्य संपवावं हे चुकीचं आहे. ज्या परिस्थितीतून सध्या त्याचं कुटुंब जात आहे, त्याची भरपाई करणं शक्य नाही.
अखेर येडियुरप्पांनी सोडली CM पदाची खुर्ची; कोण असेल नवा मुख्यमंत्री?
सोमवारी येडियुरप्पा यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपला दोन वर्षांता कार्यकाळ पूर्ण केला होता. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येडियुरप्पा यांनी वय आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे राजीनामा दिला आहे. त्याआधी त्यांनी दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या बैठकीनंतरच येडियुरप्पा आपलं पद सोडतील, असा अंदाज लावला जात होता. त्यांनी सोमवारी लिहिलं, की मागील दोन वर्षात राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली ही सन्माची बाब आहे. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Suicide, Yediyurppa