Home /News /national /

कर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत

कर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत

या पदासाठी अऩेक नावं चर्चेत असली, तरी मुख्यत्वे दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. त्यातील एक आहेत केंद्रीय कोळसा खाण मंत्री प्रल्हाद जोशी आणि दुसरे आहेत भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी.

    बंगळुरू, 26 जुलै : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून (Karnataka CM) बी. एस. येडियुरप्पा (B.S. Yedurappa) यांनी राजीनामा (Resigns) दिल्यानंतर आता नव्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा सुरु झाली आहे. सोमवारी येडियुरप्पा यांनी राज्यपाल थावरचंद गहलोत (Thawar Chand Gehlot) यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी (New CM) कोण बसणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पदासाठी अऩेक नावं चर्चेत असली, तरी मुख्यत्वे दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. त्यातील एक आहेत केंद्रीय कोळसा खाण मंत्री प्रल्हाद जोशी आणि दुसरे आहेत भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी. जर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं प्रल्हाद जोशींना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेतला, तर 1988 नंतर राज्याला पहिल्यांदाच ब्राह्मण मुख्यमंत्री मिळेल. तर सीटी रवी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली, तर दक्षिण कर्नाटकात पक्षाचा विस्तार व्हायला मदत होणार आहे. आता पक्ष यापैकी कुणाची निवड करतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मोठी खेळी भाजपने बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा घेऊन मोठी खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे नेते असल्यामुळे पक्ष कदाचित त्याच समाजातील वेगळ्या उमेदवाराची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र स्वतः येडियुरप्पा यांनी आपण कायमच पक्षासोबत राहणार असल्याचं सांगितल्यामुळे लिंगायत समाजाच्या नाराजीचा मुद्दा तितकासा गंभीर नसल्याचंही सांगितलं जात आहे. पक्ष देईल तो आदेश येडियुरप्पांना हायकमांडनं राजीनामा देण्याचा आदेश दिला होता का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना विचारला असता, भाजपामध्ये कुणीही हायकमांड नसल्याचं त्यांनी म्हटल आहे. भाजपचा हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष असून अगोदर राजनाथ सिंग, मग नितीन गडकरी, मग अमित शाह आणि आता जे. पी. नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपद असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील आणि सर्वानुमते तो मान्य केला जाईल, असं जोशी यांनी सांगितलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Karnataka, Karnataka government

    पुढील बातम्या