कर्नाटक, 26 जुलै: अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM) बी एस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resign) दिला आहे. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
कर्नाटक राज्य सरकारला 26 जुलै म्हणजेच आज दोन वर्षे पूर्ण झालीत. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.
Karnataka Governor Thawar Chand Gehlot accepts CM BS Yediyurappa's resignation, asks him to continue as caretaker CM till the next CM takes oath
(File photo) pic.twitter.com/eDCtCM8e4l — ANI (@ANI) July 26, 2021
राजीनामा देण्यासाठी कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. मी स्वत: हून राजीनामा दिला आहे जेणेकरुन सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणीतरी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारू शकेल. पुढील निवडणुकीत मी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करेन, अशी प्रतिक्रिया बी.एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली आहे.
Nobody pressurised me to resign. I did it on my own so that someone else can take over as CM after completion of 2 years of govt. I'll work to bring BJP back in power in the next election. I've not given name of anyone who should succeed me: Outgoing Karnataka CM BS Yediyurappa pic.twitter.com/AQvGmDQYbP
— ANI (@ANI) July 26, 2021
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांचे मी आभारी आहे. यांनी सर्वांनी मला दोन वर्ष कर्नाटकाची सेवा करण्याची संधी दिली. मी कर्नाटक आणि माझ्या मतदार संघातील लोकांचे आभार मानतो. मी 2 दिवसांपूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राज्यपालांनी माझा राजीनामा स्वीकारला असल्याचं बी एस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
I am grateful to PM Modi, Home Minister Amit Shah & BJP chief JP Nadda for giving me the opportunity to serve Karnataka for two years. I also thank the people of Karnataka & my constituency. I decided to resign 2 days back. The Governor has accepted my resignation: BS Yediyurappa pic.twitter.com/26XVBH0hwq
— ANI (@ANI) July 26, 2021
कोण असेल नवा मुख्यमंत्री?
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसंच उत्तर कर्नाटकचे खासदार देखील आहेत. जोशी यांच्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचाही जोर आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत असून सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. त्यांच्याकडे कुशल प्रशासक म्हणून पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. दरम्यान एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm, Karnataka, Karnataka government, PM narendra modi, Resignation, Resigns, Yediyurppa