जाहिरात
मराठी बातम्या / देश / सरकारी अधिकाऱ्यांची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा मुलगा PSC परीक्षेत अव्वल

सरकारी अधिकाऱ्यांची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा मुलगा PSC परीक्षेत अव्वल

सरकारी अधिकाऱ्यांची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा मुलगा PSC परीक्षेत अव्वल

जगन्नाथ यांच्या यशात आई-वडिलांएवढाच त्यांचा पत्नीचा मोलाचा वाटा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,21 जून : PSC परीक्षेत अव्वल होण्याचं स्वप्न बाळगणारे लहानपणापासून तयारी करतात. काहींना पहिल्या फटक्यात यश मिळत काहींना अनेक वेळा प्रयत्न करावा लागतो. सरकारी अधिकाऱ्यांची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा मुलगा PSC परीक्षेत अव्वल आला आहे. या मुलाचे वडील गुमला जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. कमी संसाधनं आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून करमाटोली येथे राहणारे जगन्नाथ लोहरा यांनी जेपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. जागरनाथ लोहरा यांचे वडील कृष्णा लोहरा हे डीसीचे ड्रायवर आहेत. त्यांनी खूप पूर्वी स्वप्नात पाहिले होते की त्याचा मुलगा देखील एक अधिकारी बनला पाहिजे. वडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केला आहे. या आधी जगन्नाथ यांनी PSCची परीक्षा दिली त्यात लेखीमध्ये यश मिळालं मात्र पुढच्या परीक्षेत अपयश पदरी पडलं. वडिलांनी पहिलेलं स्वप्न मुलानं पूर्ण केल्यानं आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे वाचा- मोदी सरकार 1000 रुपये भाड्याने देणार घर, वाचा कुणाला होणार फायदा ) जगन्नाथ यांच्या यशात आई-वडिलांएवढाच त्यांचा पत्नीचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी जगन्नाथ यांना अभ्यासात मदत केली आणि त्यांच्या या इच्छेचा मान ठेवून त्यांना सपोर्ट केला. तर कुटुंबियांकडून साथ आणि वडिलांची स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा मला हार मानू देत नव्हती. त्याच जिद्दीनं मी पुन्हा परीक्षा दिली. कृष्णा लोहरा यांचं कुटुंबीय खूप खूश आहे. मुलाच्या या यशाचा आनंद सेलिब्रेट करत आहेत तर आपलं स्वप्न जिद्दीनं पूर्ण केल्यानं त्यांचा उर अभिमानानं भरून आला आहे. हे वाचा- Fact Check: सरकारने दिले Google आणि Appleला चिनी Apps बंद करण्याचे आदेश?) हे वाचा- सरकारी अधिकाऱ्यांची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा मुलगा PSC परीक्षेत अव्वल) हे वाचा- कसं गेलं सुर्यग्रहण? आईने आणली खाण्यावरच बंदी; भन्नाट मीम्स पाहून पोट धरून हसाल )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात