Home /News /national /

Fact Check: सरकारने दिले Google आणि Appleला चिनी Apps बंद करण्याचे आदेश?

Fact Check: सरकारने दिले Google आणि Appleला चिनी Apps बंद करण्याचे आदेश?

'चीन केवळ भारतातच नाही तर इतर शेजारचा देशांच्या सीमांवरही जाणीवपूर्वक तणाव वाढवत आहे. त्यामुळे सगळीकडे तणाव आहे.'

    नवी दिल्ली, 20 जून: गेल्या काही दिवसांपासून असा दावा केला जात आहे की, मंत्रालयाच्या नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने आदेश दिला की, सरकारने गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि ऍपल अ‍ॅप स्टोअरवर काही चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. असा कोणताही आदेश देण्यात आला नसल्याचं सरकरकडून सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सुरू आहे अफवा सरकारने चिनी Apps बंद केले असल्या संदर्भात सोशल मीडियावर अफवा सुरू आहे. केंद्र सरकारने Google आणि ऍपलच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना तातडीने प्रभावीपणे त्यांच्या फोनमधील चिनी अॅप बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं या व्हायरल मेसेज मध्ये लिहिण्यात आलं आहे. यात TikTok, VMate, Vigo Video, LiveMe, Bigo Live, Beauty Plus, CamScanner, Club Factory, Shein, Romwe आणि AppLock सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. मोदींचा Yoga Day यावर्षी डिजिटल; सोशल मीडियावर अवतरले नवे इमोजी LAC वर तणावाच्या दरम्यान व्हायरल झाला मेसेज मिळालेल्या माहितीनुसार, हा बनावट मेसेज गेल्या आठवड्यात भारत आणि चीनमधील गॅलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावर, लोक चिनी उत्पादनांच्या बंदीसाठी मोहीम चालवत आहेत.  पूर्वीचे शिक्षणतज्ज्ञ आणि नवोन्मेषक सोनम वांगचुक यांनीही सांगितलं होते की, भारतीय लोकांनी चीनमध्ये बनवलेल्या वस्तू वापरू नये आणि स्मार्टफोनमधून चिनी अ‍ॅप्स काढून टाकले पाहिजेत. सुशांत तु घाई का केलीस? बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी पोस्ट! वांगचुक यांनी असेही म्हटले आहे की, चीन केवळ भारतातच नाही तर इतर शेजारचा देशांच्या सीमांवरही जाणीवपूर्वक तणाव वाढवत आहे. त्यामुळे सगळीकडे तणाव आहे. त्यात कोरोनाच्या महामारीमुळेही देशात बिकट परिस्थिती आहे. संपादन - रेणुका धायबर  
    First published:

    Tags: Apple, Google, India china border

    पुढील बातम्या