नवी दिल्ली, 08 जुलै : संपूर्ण जग सध्या कोरोनाला हरवण्यासाठी जणु युद्धचं लढत आहे. भारतही यात आघाडीवर आहे. एकीकडे कोरोनाची लस कधी येणार? हा प्रश्न अनुत्तरित असला तरी, भारतीय कंपनी एक मेड इन इंडिया लस तयार करण्यासाठी सज्ज आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एका शेतकऱ्याचा मुलगा दिवस रात्र एक करून पहिली भारतीय लस तयार करत आहे. COVAXIN ही भारतीय लस लवकरच उपलब्ध होणार असूस, याच्या ह्युमन क्लिनिकल ट्रायलाही परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेक ही कंपनी सध्या कोरोनावर लस तयार करत आहेत. या कंपनीच्या मालकाचे नाव आहे डॉ. कृष्णा एला. डॉ. कृष्णा यांनी 15 ऑगस्ट पर्यंत लस उपलब्ध करून देण्याचाही दावा केला आहे. कृष्णा यांची कंपनी कंपनी नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ़ वायरोलॉजी आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीनं COVAXIN नावाची लस तयार करत आहे. डॉ. कृष्णा तेच डॉक्टर आहेत ज्यांच्या कंपनीने जगाला सर्वात स्वस्त हेपेटायटिसवरील लस दिली होती. एवढेच नाही तर, या कंपनीने जीका व्हायरसवरही लस शोधली होती. वाचा- Coronavirus हवेतून पसरू शकतो? अखेर WHO नेही घेतली पुराव्यांची दखल रेडिफच्या रिपोर्टनुसार, डॉ. कृष्णा यांनी शेतीविषयक अभ्यास केला होता. त्यामुळं त्यांना कायम शेतकरी व्हायचे होते. आर्थिक गरजांसाठी त्यांनी केमिकल आणि फार्मा कंपनी बायरसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान त्यांना फेलोशिप आणि स्कॉलरशिप मिळाली आणि ते अमेरिकेत गेले. वाचा- Corona ला गांभीर्यानं न घेणाऱ्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाच झाला संसर्ग हवाई विद्यापीठातून मास्टर्स आणि विस्कॉन्सिन मेडिसन विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर विदेशातच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र त्यांच्या आईमुळे ते भारतात आले. त्यांच्या आईचे स्वप्न होते की, आपल्या मुलानं देशासाठी काहीतरी करावे. भारतात आल्यानंतर डॉ. कृष्णा यांनी भारत बायोटेक नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीनं सर्वात आधी हेपेटायसिसवर लस निर्माण केली. भारत बायोटेक कंपनी हैदराबादमध्ये असून सुरुवातीला केवळ एक छोटी लॅब होती. वाचा- ऑक्सफर्डची corona लस यायला 6 महिने! भारत बायोटेकप्रमाणे हीसुद्धा लस इतक्यात नाही भारत बायोटेक कंपनीने प्रिजर्वेटिव्ह फ्री लस तयार केली होती. याचे नाव होते Revac-B mcF हेपेटायटिस B वॅक्सिन. ही कंपनी भारतातील पहिली कंपनी आहे, ज्यांनी सेल कल्चरल स्वाइन फ्लू लस तयार केली. जीका व्हायरसवर लस शोधणारीही भारत बायोटेक जगातील पहिली कंपनी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.