ब्राझीलिया, 7 जुलै : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो (Brazil’s President Jair Bolsonaro) यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बोल्सोनारो यांना कोविड – 19 ची लक्षणे दिसल्यानंतर सोमवारी त्यांची तपासणी करण्यात आली. बोल्सनारो यांना तीव्र ताप होता. बोल्सोनारो सतत कोरोना विषाणूच्या धोक्यास साधा फ्लू म्हणून कमी लेखत होते. त्यांनी बर्याच वेळा जाहीरपणे सांगितले होते की, या विषाणूचा फारसा परिणाम होणार नाही. हे वाचा- राज्यात आजही 5000 वर नवे रुग्ण; बळींची संख्या 10 हजारांच्या टप्प्याजवळ इतकेच नव्हे तर बोल्सोनारो यांनी प्रांताच्या राज्यपालांना अनेक वेळा लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सांगितले आहे. बोल्सनारो म्हणाले की, यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल. जायर बोल्सोनारो यांनी सोमवारी फेस मास्क घालण्याचे नियमही रद्द केले होते. ब्रासिलियामध्ये रविवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत राष्ट्राध्यक्षांनी ब्राझीलच्या जनतेला कामावर परत जाण्याचा, हँडशेक करण्याचा सल्ला दिला होता. शिवाय अनुयायांना सेल्फी काढण्याची सूट दिली होती. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखांहून अधिक गेली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 7 हजारांहून अधिक जणांचा जीव गेला आहे. कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्याबाबत एका पत्रकारानं विचारल्यानंतर बोल्सोनारो म्हणाले होते की “मग काय झालं? इतके लोक मेले तर मी काय करणार? मी काही चमत्कार नाही करू शकत.” आता त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.