मराठी बातम्या /बातम्या /पुणे /ऑक्सफर्डची corona लस यायला किमान 6 महिने! भारत बायोटेकप्रमाणे हीसुद्धा लस इतक्यात नाहीच

ऑक्सफर्डची corona लस यायला किमान 6 महिने! भारत बायोटेकप्रमाणे हीसुद्धा लस इतक्यात नाहीच

भारत बायोटेकप्रमाणेच ऑक्सफर्डची कोरोना लसही (oxford corona vaccine) या वर्षी तरी येणार नाही.

भारत बायोटेकप्रमाणेच ऑक्सफर्डची कोरोना लसही (oxford corona vaccine) या वर्षी तरी येणार नाही.

भारत बायोटेकप्रमाणेच ऑक्सफर्डची कोरोना लसही (oxford corona vaccine) या वर्षी तरी येणार नाही.

पुणे, 07 जुलै : भारतात भारत बायोटेकमार्फत (Bharat biotech) तयार करण्यात आलेली कोरोनाव्हायरसविरोधातील लस (corona vaccine) 2021 पर्यंत तरी येणार नाही हे स्पष्ट झालं. त्यानंतर भारताची भागीदारी असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (oxford university) लशीची आशा सर्वांना होती. मात्र आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लसदेखील यावर्षी येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण ऑक्सफर्डची लस यायला अजून 6 महिने लागणार आहेत.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या लशीत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची (Serum Institute of India) भागीदारी आहे. या इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितलं की ऑक्सफर्डची लस यायला अजून सहा महिने लागतील. याचा अर्थ ऑक्सफर्डची लसदेखील या वर्षात येणार नाही.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने सीरम इन्स्टिट्युटनेही कोरोनाव्हायरसविरोधातील लस विकसित केली आहे.

'सहा महिन्यात कोरोनाची कोणतीच लस नाही'

दरम्यान जगभरात कुठेही कोरोनाची लस यायला आणखी किमान सहा महिने लागणार, असं पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी याआधी सांगितलं होतं.

हे वाचा - बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यावर कोरोनाची एंट्री, सात दिवस राहणार क्वारंटाइन

कोरोनाव्हायरसवरील लस येईपर्यंत काय करायला हवं याबाबत डॉ. राजीव ढेरे यांनी मार्गदर्शन केलं आहे. "पुढचं एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोना विषाणूसोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचं सुनिश्चित करा. शिवाय ज्यांना रक्तदाब सारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये", असा सल्ला डॉ. ढेरे यांनी दिला आहे.

'कोरोना लशीची गरज पडणार नाही'

तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या  प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता (Sunetra Gupta) यांनी कोरोनाची लस येईल मात्र कदाचित या लशीची गरजही पडणार नाही, असा दावा केला आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, "सामान्यत: निरोगी लोक, जे वृद्ध नाहीत, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही अशा लोकांना कोरोनाव्हायरसला घाबरण्याची काहीच गरज नाही, हा फ्लूप्रमाणेच असेल. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल अशी मला आशा आहे"

हे वाचा - गोव्यातील डॉक्टरची माणुसकी; कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना 'जादुची झप्पी'

"कोरोनाव्हायरसची लस तयार करणं सोप आहे. लवकरच लस चांगली काम करत आहे, याचे पुरावे आपल्याकडे असतील.  मात्र जेव्हा लस येईल तेव्हादेखील ती सर्वप्रथम कमजोर आणि जास्त धोका असलेल्या लोकांना दिली जाईल. बाकी लोकांना व्हायरसबाबत चिंता करण्याची गरज नाही. कोरोनाव्हायरसची महासाथ नैसर्गिकरित्या संपेल. हा व्हायरस इन्फ्लूएंझाप्रमाणे लोकांच्या आयुष्याचा भाग होऊन जाईल", असं सुनित्रा यांनी सांगितलं.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Oxford