ऑनलाइन क्लासमध्ये मुलाने पोस्ट केला पॉर्न PHOTO, ग्रुपवर केलं अश्लील चॅट

ऑनलाइन क्लासमध्ये मुलाने पोस्ट केला पॉर्न PHOTO, ग्रुपवर केलं अश्लील चॅट

ऑनलाइन क्लास सुरू असतानाच ग्रुपमध्ये विद्यार्थ्याने पॉर्न फोटो पोस्ट केला आणि खळबळ उडाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 मे : कोरोना व्हायरमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे देशातील सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. लॉकडाऊनमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत. मात्र ऑनलाइन क्लासमध्ये शिकताना मुलांचा खट्याळपणा कमी झालेला नाही. असाच एक प्रकार उघडकीस आला असून तो धक्कादायक आहे. मुले शिक्षकांचं ऐकायचं दूरच ऑनलाइन क्लासमध्ये अश्लील चर्चा करत होते.

उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात 12वीच्या मुलांचा ऑनलाइन क्लास सुरू होता. तेव्हा एका विद्यार्थ्यांने ग्रुपमध्ये पॉर्न फोटो पोस्ट करून अश्लील चर्चा करायला सुरुवात केली. त्याचवेळी ग्रुपमध्ये असलेल्या शिक्षकांना शिव्यासुद्धा दिल्या. एका विद्यार्थ्यांने ग्रुपवर अश्लील फोटो पोस्ट करताच विद्यार्थीनींनी ग्रुप सोडायला सुरुवात केली. पोस्ट पाहताच शिक्षक आणि पालकांचेही धाबे दणाणले आणि शाळा प्रशासनही हादरलं.

हे वाचा : CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांची तारीख जाहीर

या प्रकरणाची संपूर्ण माहिती शाळेच्या प्राचार्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडे हा प्रकार गेला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्याने हे फोटो टाकले तो दुसऱ्याच विद्यार्थ्याच्या नावाने आणि फोटोने 12 वीच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड झाला होता. पोलिसांनी अश्लील पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्याचा शोध घेतला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद कऱण्यात आला असून विद्यार्थ्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचा : सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात नव्हे तर इथे झाल्या सर्वाधिक Coronaचाचण्या

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन क्लास सुरू करण्यात आले आहेत. मात्रा काही मुलांकडून असे प्रकार झाल्यानं आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे पालक मुलांच्या भविष्याची चिंता करत आहेत.

हे वाचा : मुंबईहून 1493 किमी पायी सुरू केला प्रवास, रस्त्यात अचानक आली चक्कर आणि...

First published: May 8, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या