मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईहून 1493 किमी पायी सुरू केला प्रवास, रस्त्यात अचानक आली चक्कर आणि...

मुंबईहून 1493 किमी पायी सुरू केला प्रवास, रस्त्यात अचानक आली चक्कर आणि...

मुंबईहून उत्तर प्रदेशमधील गोंडा हे शहर 1493 किमी अंतरावर आहे.

मुंबईहून उत्तर प्रदेशमधील गोंडा हे शहर 1493 किमी अंतरावर आहे.

मुंबईहून उत्तर प्रदेशमधील गोंडा हे शहर 1493 किमी अंतरावर आहे.

मुंबई, 08 मे : कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा 17 मेपर्यंत वाढवण्यात आला. यामुळं परराज्यांमध्ये अडकलेले मजूर आपल्या घरी जाण्यासाठी जमेल त्या मार्गानं प्रवास करत आहेत. काहींनी पायी प्रवास करत घर गाठलं तर काहींचा जीवनप्रवासच संपत आहे. एकीकडे सरकाराने मजूरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली असली तरी हजारो मजूर अजूनही पायी प्रवास करत आहेत. अशाच एका उत्तर प्रदेशातील गोंडा येथे पोहचण्यासाठी निघालेल्या तरुणांचा वाटेतच मृत्यू झाला.

मुंबईहून उत्तर प्रदेशमधील गोंडा हे शहर 1493 किमी अंतरावर आहे. 4 मजूरांनी पाच दिवसांआधी पायी प्रवासास सुरुवात केली. मृत तरुणाचा भाऊ मोहम्मद शकील यांनी आज तकला दिलेल्या माहितीत, 4-5 दिवसांआधी पायी प्रवासाला सुरुवात केली. काही वेळा ट्रकमधून काही अंतर प्रवास केला. तर इतर वेळी चालत. काही वाहनचालकांनी आमच्यावर दया दाखवत लिफ्ट दिली. मात्र त्यानंतरही पायी प्रवास करावा लागतच होता, असे सांगितले. त्यांच्यातीलच एक सहप्रवासी निसार अहमद याला अचानक चक्कर आली. काही अंतर चालल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. जवळच असलेल्या पेट्रोल पम्पवर त्याला पाणी पाजण्यात आले. त्यानंतर त्याला थोडं बरं वाटू लागल्यानंतर पुन्हा पायी प्रवासास सुरुवात केली. मात्र काही अंतर चालल्यानंतर निसारला पुन्हा त्रास झाला. चक्कर येऊन पडल्यानंतर तब्बल 1 तास तो उठला नाही, म्हणून त्याच्या मित्रांनी पोलिसांना फोन केला.

कोट्यवधी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 6 हजार रुपये, असं तपासा या यादीत तुमचं नाव

पोलीस लगेचच घटनास्थळी पोहचले, मात्र तोपर्यंत निसारचा मृत्यू झाला होता. निसारच्या मित्रानं सांगितले की, त्यानं बुधवारी रोजाही ठेवला होता.गुरुवारी रोजा ठेवला नाही. 30-35 किमी प्रवास केल्यानंतर आम्ही थोड्यावेळ आराम करत होतो. मात्र थकव्यामुळं निसारला त्रास झाला. दरम्यान मुंबईतीलच एका रुग्णालयात निसारचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये 16 मजूरांना ट्रेननं चिरडलं

जालना येथून मध्य प्रदेशात पायी निघालेल्या 16 मजुरांना औरंगाबादमधील करमाडजवळ रेल्वेनं चिरडलं. या घटनेत 16 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला असून 1 गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास जालन्याकडून येणाऱ्या मालगाडीने या मजुरांना चिरडले. सर्व मजूर जालन्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले होते. मजुरांनी 45 किलोमीटरचा प्रवास करून करमाड येथे पोहोचले होते. तिथून ते भुसावळला जाऊन स्पेशल ट्रेनने मध्य प्रदेशात जाणार होते. पायी चालून थकलेले मजूर करमाड गावाजवळ रेल्वे रूळावरच थांबले. त्यावेळी हा अपघात झाला.

कोरोनाची लागण झाल्यानंतर SRPF जवानांचं बेजबाबदार वर्तन

First published:
top videos

    Tags: Corona