जाहिरात
मराठी बातम्या / देश / CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांची तारीख जाहीर

CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांची तारीख जाहीर

CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांची तारीख जाहीर

Coronavirus चा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. CBSE ने परीक्षांची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 मे : दहावी-बारावीच्या राहिलेल्या परीक्षा १ जुलैपासून घेणार, अशी मोठी घोषणा CBSE ने जाहीर केलं आहे. Coronavirus चा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. परीक्षा होणार की नाही, इथपासून अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. त्यामुळे मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

जाहिरात

दहावी आणि बारावीच्या कुठल्या विषयांचे पेपर कधी असतील याचं सविस्तर वेळापत्रक काही वेळात CBSE जाहीर करेल. 1 ते 15 जुलैदरम्यान या रखडलेल्या परीक्षा घेण्यात येतील. महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा कोरोनाच्या संकटाआधीच पूर्ण झाली. पण दहावीची परीक्षा मात्र पूर्ण होऊ शकली नव्हती. एक पेपर राहिलेला असतानाच लॉकडाऊन सुरू झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. पण राज्य बोर्डाने भूगोलाची परीक्षा पुन्हा घेणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. हा पेपर आता होणार नाही. इतर विषयांच्या गुणावरून सरासरी गुण काढले जातील. अन्य बातम्या मोठी बातमी! विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द मध्यरात्री उठून 500 मुस्लीम कैद्यांसाठी न्याहरी तयार करतात हिंदू बांधव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात