मराठी बातम्या /बातम्या /देश /

धुमसतं जम्मू-काश्मीर शांततेच्या वाटेवर? या कारणांमुळे दगडफेकीच्या घटनांत मोठी घट

धुमसतं जम्मू-काश्मीर शांततेच्या वाटेवर? या कारणांमुळे दगडफेकीच्या घटनांत मोठी घट

मागील काही काळात जम्मू-काश्मीर (Jammu kashmir) परिसरात दहशतवादी  कारवाया आणि दगडफेकीच्या (Stone Pelting) घटनांत प्रचंड घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मागील काही काळात जम्मू-काश्मीर (Jammu kashmir) परिसरात दहशतवादी कारवाया आणि दगडफेकीच्या (Stone Pelting) घटनांत प्रचंड घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मागील काही काळात जम्मू-काश्मीर (Jammu kashmir) परिसरात दहशतवादी कारवाया आणि दगडफेकीच्या (Stone Pelting) घटनांत प्रचंड घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

श्रीनगर, 04 ऑगस्ट: मागील बऱ्याच वर्षांपासून जम्मू काश्मीर (Jammu kashmir) हा परिसर भारतासाठी अत्यंत संवेदनशील परिसर राहिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं होणारे दहशतवादी हल्ले (Terrorist Attack) आणि हिंसक कारवाया (Violence) यामुळे हा परिसर नेहमीच धुमसत राहिला आहे. पण मागील काही काळात जम्मू-काश्मीर परिसरात दहशतवादी  कारवाया आणि दगडफेकीच्या (Stone Pelting) घटनांत प्रचंड घट झाल्याची माहिती समोर आली आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये दगडफेकीच्या घटनांत तब्बल 88 टक्क्यांनी कमी झाल्याचं चित्र आहे.

गृह मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2019 सालातील जानेवारी ते जुलै दरम्यान दगडफेकीच्या एकूण घटनांच्या तुलनेत 2020 साली तब्बल 88 टक्क्यांनी घट झाली आहे. या व्यतिरिक्त, हिसंक घटनांत जखमी किंवा मृत होणारे सुरक्षा दलाच्या जवान आणि बंडखोर नागरिक यांची संख्या देखील 93 टक्क्यांवरून घटून 84 टक्क्यांवर आली आहे.

हेही वाचा-पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच सडणार, आतंकवादी मसूद अजहरबाबत ठोस पुरावा हाती

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, 2019 मध्ये जानेवारी ते जुलै दरम्यान दगडफेकीच्या एकूण 618 घटना घडल्या आहेत. तर 2020 मध्ये, याच कालावधीत केवळ 222  दगडफेकीच्या घटना घडल्या आहे. तर चालू वर्षात हा आकडा फक्त 76 इतका आहे. 2019 मध्ये सुरक्षा दलांचे 64 जवान जखमी झाले होते, तर यावर्षी फक्त 10 सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. याशिवाय पेलेट गन किंवा लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या नागरिकांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. 2019 मध्ये, लष्करी कारवायांत 339 नागरिक जखमी झाले होते. तर यावर्षी हा आकडा फक्त 25 इतका आहे.

हेही वाचा-ओसामा बिन लादेनच्या भावाच्या आलिशान हवेलीचा होणार लिलाव; किंमत ऐकून बसेल धक्का

नेमकी कारणं काय आहेत?

खरंतर, जम्मू काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांत घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारकडून लादण्यात आलेले कोरोना निर्बंध. कारण मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. त्यामुळे देशभर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर तरुणांना एकत्र येता येत नाही. तसेच केंद्र सरकाराने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील अटक कारवाया तीव्र केल्या आहेत. तसेच या प्रदेशात मोठ्या संख्येनं सुरक्षा दल तैनात केलं आहे.

हेही वाचा-सिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग..;तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा

दरम्यानच्या काळात दहशतवाद्यांना अटक करण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. 2019 मध्ये जानेवारी ते जुलै दरम्यान 82 दहशतवादी पकडले गेले होते. यावर्षी आतापर्यंत 178 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय दगडफेकीत सामील झालेल्यांना सरकारी नोकरीसाठी किंवा पासपोर्टसाठी सिक्युरिटी क्लिअरन्स दिला जाणार नसल्याचा आदेश जम्मू काश्मीर प्रशासनानं जारी केला आहे.

First published:

Tags: Jammu kashmir