मराठी बातम्या /बातम्या /देश /

'5 मिनिटं उभं राहून द्या मोदींना मानवंदना!' पण या मोहिमेवर पंतप्रधानांनी प्रत्यक्षात काय खुलासा केला पाहा...

'5 मिनिटं उभं राहून द्या मोदींना मानवंदना!' पण या मोहिमेवर पंतप्रधानांनी प्रत्यक्षात काय खुलासा केला पाहा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिप प्रज्वलन केलं. त्यांनी ट्विटरवरून फोटो शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिप प्रज्वलन केलं. त्यांनी ट्विटरवरून फोटो शेअर केले आहेत.

पाच मिनिटं उभं राहून मोदींना मानवंदना द्या, या अर्थाचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. याबाबत खुद्द पंतप्रधानांनी अखेर खुलासा केला आहे.

    नवी दिल्ली, 8 एप्रिल : पाच मिनिटं उभं राहून मोदींना मानवंदना द्या, या अर्थाचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. या संदेशांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने घेतली आहे. त्यांनी Twitter वरून याबाबतीत खुलाला केला आहे. ही मोहीम कुणाचा तरी वाद निर्माण करण्यासाठी केलेला खोडसाळपणा असू शकतो, अशी शंका मोदींनी व्यक्त केली. पण त्याबरोबरच त्यांनी दुसरीही बाजू मांडली. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या गरिबांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं. '5 मिनट खड़े रहकर मोदी को सम्मानित किया जाए।' या अर्थाची मोहीम चालवली जात असल्याचं मोदींच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने याची दखल घेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा - सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी दिला मोदींना सल्ला, केल्या 10 मोठ्या मागण्या "पहिल्या नजरेत तर ही मोहीम म्हणजे मोदींना वादात ओढण्यासाठी केलेली कुरापत वाटते...", असं लिहून मोदी म्हणतात, "खरंच कुणी मला सदिच्छेपोटी असा सन्मान द्या असं सांगत असेल, तरी माझा एक आग्रह आहे. तुमच्या मनात मोदींबद्दल इतकं प्रेम आणि आदर असेल तर कोरोनाचं हे संकट दूर होईपर्यंत किमान एका गरीब कुटुंबाची जबाबदारी उचला. माझ्यासाठी यापेक्षा मोठा सन्मान आणि मानवंदना दुसरी कुठली असूच शकत नाही." पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला 22 मार्चला आरोग्य सेवक आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर गेल्या रविवारी - 5 एप्रिलला 9 मिनिटांसाठी लाइट मालवून फक्त मेणबत्त्या, आणि टॉर्चचा प्रकाश गॅलरी, खिडक्यांमधून तेवत ठेवावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. कोरोनाविरोधातल्या लढाईत एकात्मतेचं दर्शन घडवण्यासाठी आणि आपण एकत्र असल्याची भावना दृढ करण्यासाठी हा उपक्रम असल्याचं मोदींनी सांगितलं. अन्य बातम्या PM पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणार; 11 तारखेला होणार मोठा निर्णय केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या