नवी दिल्ली, 8 एप्रिल : देशातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरूद्धच्या लढ्यात प्रत्येकजण आपली भूमिका बजावत आहे. लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने जनतेला गरजूंसाठी आणि स्वत:साठी घरातच मास्क (Mask) शिवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबीयांनीही घरातच मास्क बनवण्याची सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांची पत्नी आणि मुलगी शिवणकामाच्या मशिनने मास्क शिवत असल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. त्याच वेळी काही तयार झालेले मास्क जवळच ठेवले जात आहे.
We should all try and do our bit for society in these difficult times. Proud of my wife Mridula and daughter Naimisha who are making safety masks for all of us at home, and also for others who need it. No better time to hone your skills and learn new ones. #Masks4Allpic.twitter.com/YtGNZvj7VS
धर्मेंद्र प्रधान यांनी फेसबुकवर लिहिले की, 'या कठीण काळात आपण सर्वांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला माझी पत्नी मृदुला आणि मुलगी नैमिषाचा अभिमान आहे. त्या आमच्या सर्वांना आणि गरजूंसाठी सेफ्टी मास्क बनवत आहेत. आपली कौशल्ये सुधारण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी यापेक्षा चांगला काळ नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूरचे खासदार नवानंद कंवर आणि केंद्रीय जल उर्जामंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची पत्नीही मास्क शिवत असतानाची छायाचित्र समोर आली होती. देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटातून गोरगरीबांना वाचवण्यासाठी त्यांनी मास्क शिवले होते. या कामात त्याच्या मुलींनी त्याला मदत केली.
सध्या देशातील कोरोनाचा आकडा 5000 च्या वर गेला आहे. त्याच वेळी 149 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने जनतेला जास्तीत जास्त वेळ मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही किंवा जे पूर्णपणे निरोगी आहेत त्यांनीही घरी मास्क वापरला हवा.