मराठी बातम्या /बातम्या /देश /Spicejet विमानाला अपघात; उड्डाण घेण्यापूर्वीच विजेच्या खांबाला दिली धडक, मोठी दुर्घटना टळली!

Spicejet विमानाला अपघात; उड्डाण घेण्यापूर्वीच विजेच्या खांबाला दिली धडक, मोठी दुर्घटना टळली!

प्रवाशांनी भरलेलं विमान उड्डाण घेणारच होतं, तेवढ्यात...

प्रवाशांनी भरलेलं विमान उड्डाण घेणारच होतं, तेवढ्यात...

प्रवाशांनी भरलेलं विमान उड्डाण घेणारच होतं, तेवढ्यात...

नवी दिल्ली, 28 मार्च : आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर (Delhi Airport) एक मोठा अपघात टळल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोमवारी सकाळी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या एका प्रवाशांनी भरलेल्या विमानाच्या विग्सचा एक भाग पूश बॅक होताना विजेच्या खांबाला टक्कर दिली. यानंतर सर्व प्रवाशांना विमानाने रवाना करण्यात आलं. सुदैवाने या अपघातात कोणालाही जखम झाली नाही. स्पाइस जेटकडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

स्पाइसजेट प्रवक्ताने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, आज स्पाइसजेटचं उड्डान एसजी 160 दिल्ली आणि जम्मूदरम्यान संचालित होणार होती. पूश बँक करीत असताना राइट विंग ट्रेलिंग एज एक पोलला धडकला. ज्यामुळे एलेरॉनचं नुकसान झालं. उड्डाण संचलित करण्यासाठी एक रिप्लेसमेंट एअरक्राफ्टची व्यवस्था करण्यात आली.

हे ही वाचा-Online Game ने लावलं याड, मानसिक संतुलन बिघडलं अन् रस्त्यावर पळू लागला सैरावैरा, आता झाली अशी अवस्था

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा विमान पॅसेंजर टर्मिनलहून रनवेच्या दिशेने पुढे गेलं होतं. या घटनेत विमान आणि विजेच्या पोलचं नुकसान झालं. या दुर्घटनेनंतर विमान पुन्हा मार्गाने आणण्यात आलं आणि प्रवाशांना दुसऱ्या विमानात बसवण्यात आलं. नागर विमानन महानिदेशालय (DGCA) यांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. सुदैवाने या प्रकरणात कोणी जखमी झालेलं नाही. विमानाच्या राइट विंगचं नुकसान झालं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमान दिल्लीहून सकाळी  9.20 वाजता रवाना होणार होतं.

First published:
top videos

    Tags: Accident, Spicejet, Travel by flight