मराठी बातम्या /बातम्या /देश /दिल्लीहून दुबईला निघालेल्या Spicejet च्या फ्लाईटचं पाकिस्तानात लँडिंग; नेमकं काय घडलं?

दिल्लीहून दुबईला निघालेल्या Spicejet च्या फ्लाईटचं पाकिस्तानात लँडिंग; नेमकं काय घडलं?

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या SG-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कराची (पाकिस्तान) येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या SG-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कराची (पाकिस्तान) येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या SG-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कराची (पाकिस्तान) येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

नवी दिल्ली 05 जुलै : दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या SG-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कराची (पाकिस्तान) येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या प्रकरणावर एक निवेदन जारी करताना स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, स्पाइसजेट B737 विमान ऑपरेटिंग फ्लाइट SG-11 (दिल्ली-दुबई) इंडिकेटर लाईटच्या खराबीमुळे कराचीला वळवण्यात आली (SpiceJet flight makes emergency landing in Pakistan).

अमरावतीनंतर उदयपूरमध्येही NIA ला मोठं यश; वसीम नावाच्या आरोपीला अटक

विमान कराचीत सुखरूप उतरलं आणि प्रवाशांना सुखरूप लँड करण्यात आलं आहे. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, कोणतीही आपात्कालीन स्थिती ओढावली नाही आणि विमानाने सामान्य लँडिंग केलं. याआधी या विमानात काहीही बिघाड झाल्याचं वृत्त नव्हतं.

प्रवाशांच्या नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. दुसरं विमान कराचीला पाठवलं जात आहे, जे प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल. याआधीही स्पाइसजेटच्या विमानाबाबत अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतंच दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात बिघाड झाल्याने हे विमान पुन्हा दिल्लीला परतलं होतं.

Golden Chance! कोणतीही परीक्षा न देता थेट 2 लाख रुपये पगाराची नोकरी; पॉवरग्रीडमध्ये अनेक Vacancy

यावेळी विमान 5000 मीटर उंचीवर असताना अचानक केबिनमध्ये धूर पसरू लागला. त्यामुळे विमानाचं दिल्लीत लँडिंग करावं लागलं. काही वेळाने प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जबलपूरला नेण्यात आलं. त्याचवेळी, या घटनेपूर्वीच पाटणा येथे स्पाइसजेटचं विमान एका पक्ष्याला धडकलं होतं, त्यामुळे इंजिनला आग लागली होती. यानंतर पाटणा विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं.

DGCA ने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, क्रूला डाव्या बाजूच्या टाकीतून इंधनाच्या प्रमाणात असामान्य घट झाल्याचं लक्षात आलं. मात्र यानंतर तपासणीत काहीही गडबड आढळून आली नाही. टाकीतून इंधनाची कुठेही गळती झालेली नव्हती. पण इंडिकेटरवर तरीही कमी इंधन दाखवत होतं. त्यामुळे विमान कराचीमध्ये लँड करण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Spicejet, Travel by flight