Home /News /crime /

अमरावतीनंतर उदयपूरमध्येही NIA ला मोठं यश; वसीम नावाच्या आरोपीला अटक

अमरावतीनंतर उदयपूरमध्येही NIA ला मोठं यश; वसीम नावाच्या आरोपीला अटक

NIA कडून मोठी कारवाई...

    उदयपूर, 4 जुलै : अमरावतीत उमेश कोल्हे (Amravati Umesh Kolhe Murder) यांच्या हत्येप्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर आता उदयपूरमधील (Udaipur Murder Case) कन्हैया लाल हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. नुपूर शर्मा यांना समर्थन केल्याप्रकरणी ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. उदयपूर प्रमाणेच अमरावतीतदेखील उमेश कोल्हे या केमिस्टची नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्याच्या मुद्द्यावरुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात NIA ची टीम तपास करीत असून आतापर्यंत 5 ते 6 जणांना अटक करण्यात आली आहे. आता NIA ची टीम पुन्हा उदयपूरला पोहोचली आहे. येथे वसीम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीनंतर आता उदयपूर प्रकरणात एनआयएला मोठं यश ंमिळालं आहे. उदयपूरमध्ये NIA कडून तपास सुरू असून चार संशयास्पद लोकांनाही अटक केली जाऊ शकते. याशिवाय आणखीही लोकांना अटक केलं जाऊ शकतं, असंही NIA च्या टीमकडून सांगितलं जात आहे. काय आहे प्रकरण? उदयपूरमध्ये 28 जून रोजी दुपारी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद या दोन तरुणांनी टेलर कन्हैयालालवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. आरोपी कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात आले होते. यानंतर दोन्ही आरोपींनी व्हिडिओ शेअर करत इस्लामच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कन्हैयालालची हत्या केल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर आरोपींनी पीएम मोदींनाही धमकावलं. उदयपूरच्या रियासत हुसैन आणि अब्दुल रज्जाक या दोन मौलवींनी हत्येतील आरोपी मोहम्मद घौस याला दावत-ए-इस्लामीच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवलं होतं. घौस याच्यासोबत वसीम अत्तारी आणि अख्तर रझा हे पाकिस्तानला गेले होते. तिघांनाही एनआयएने ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मौलाना आणि दोन वकीलही या कटात सहभागी आहेत, त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींची एक बैठक झाली होती ज्यामध्ये रियाझ अत्तारीने टेलर कन्हैयालालच्या हत्येची जबाबदारी घेतली होती
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang murder, Rajasthan

    पुढील बातम्या