मराठी बातम्या /बातम्या /देश /'आम्हाला गोड मुलगा मिळाला, अजून काही नको...' शबनमच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या दांपत्याने स्वतःला मूल होऊ नाही दिलं

'आम्हाला गोड मुलगा मिळाला, अजून काही नको...' शबनमच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या दांपत्याने स्वतःला मूल होऊ नाही दिलं

Shabnam Death Penalty: स्वतःच्या कुटुंबीयांचाच खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि सध्या जेलमध्ये असलेल्या शबनमच्या मुलाला दत्तक घेतलंय उस्मान आणि वंदनाने. अनेकदा रक्ताच्या नात्याइतकीच मानलेली नाती सच्ची ठरतात, त्याचीच ही जगावेगळी कथा.

Shabnam Death Penalty: स्वतःच्या कुटुंबीयांचाच खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि सध्या जेलमध्ये असलेल्या शबनमच्या मुलाला दत्तक घेतलंय उस्मान आणि वंदनाने. अनेकदा रक्ताच्या नात्याइतकीच मानलेली नाती सच्ची ठरतात, त्याचीच ही जगावेगळी कथा.

Shabnam Death Penalty: स्वतःच्या कुटुंबीयांचाच खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि सध्या जेलमध्ये असलेल्या शबनमच्या मुलाला दत्तक घेतलंय उस्मान आणि वंदनाने. अनेकदा रक्ताच्या नात्याइतकीच मानलेली नाती सच्ची ठरतात, त्याचीच ही जगावेगळी कथा.

पुढे वाचा ...

बुलंदशहर, 2 मार्च : 'आम्ही याला जेलमधून आणलं तेव्हा हा खूप घाबरलेला असायचा. त्यावेळी याचं वय जवळपास सात वर्ष होतं. मात्र एखाद्या तीन वर्षांच्या मुलासारखा घाबरून झोपेतून उठायचा. त्याला अंधाराची खूप भीती वाटायची. रात्री अचानक जागा व्हायचा. म्हणायचा, 'उंदरानं माझ्या पायाचा चावा घेतला आहे, जेलमध्येही उंदीर चालायचे.' हे सांगताना वंदनाच्या अंगावर काटा येतो. (son of Shabnam who is in jail for killing family)

बुलंदशहरच्या वंदना आणि उस्माननं शबनमच्या मुलाला, जैदला (काल्पनिक नाव) दत्तक घेतलं तेव्हा त्याचं वय 6 वर्ष 7 महिने होतं. Dainik Bhaskarनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. (couple who adopted son of Shabnam)

जैद त्याच शबनमचा मुलगा आहे जिनं आपला प्रियकर सलीमसोबत आपल्याच कुटुंबातील सात लोकांची हत्या केली. या गुन्ह्यासाठी शबनमला फाशीची शिक्षा सुनावली गेली. अमरोह्याच्या बावनखेडी गावात एप्रिल 2008 मध्ये या भयानक हत्याकांडावेळी शबनम गर्भवती होती. जैद तिच्या पोटात होता. जैदनं डोळे उघडले ते जेलच्या चार भिंतींच्या आत. (son of Shabnam born in jail)

शबानामची तारीख पडायची तेव्हा जैद तिच्या कुशीत असायचा. कोर्ट-कचेरीच्या गर्दीत अस्वस्थ झालेला जैद शबनमच्या गळ्याला घट्ट मिठी मारून शांत बसलेला असायचा. जैदचा लीगल गार्डियन बनण्यासाठी उस्मान आणि वंदनाला खूप कष्ट घ्यावे लागले. शेवटी दोघांना यश आलं आणि आता जैद त्यांच्याकडे सुरक्षित आहे. (guardian of Shabnam son in Bulandshahar)

हेही वाचा  शबनमची फाशी पुन्हा टळली; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला होणार होता मृत्युदंड

30 जुलै 2016 ला जैद पहिल्यांदा मुरादाबाद जेलमधून बाहेर निघाला. आपले नवे आई-वडील उस्मान आणि वंदनाच्या कुशीत आला. त्यावेळी त्यानं तीन इच्छा प्रकट केल्या. आईस्क्रीम खायचं आहे, नवे ऑफिसला घालण्याचे कपडे पाहिजेत आणि सलमान खानला भेटायचं आहे. तो दिवस आठवताना उस्मान म्हणता, 'अडीच वर्षांच्या मेहनतीनंतर जैद आम्हाला मिळाला होता. हा आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. आम्ही त्याला आईस्क्रीम खाऊ घातलं. ऑफिसच्या कपड्यांची गोष्ट आम्हाला नंतर समजली. त्याला खरंतर एखाद्या अधिकाऱ्यासारखे कपडे पाहिजे होते. त्याला मस्त कोट आणि पॅन्ट पाहिजे होती. ते आम्ही शिवले. आता सलमान खानला भेटवण्याची इच्छा मात्र राहिली आहे. तीसुद्धा आम्ही लवकर पूर्ण करू.

शबनमला पूर्वीपासून ओळखायचो. तिच्या मुलाला दत्तक घेण्याचा केला होता निश्चय

उस्मान शबनमला कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतात. अमरोहाच्या जेएस हिंदू कॉलेजमध्ये शबनम त्यांची सिनियर होती. उस्मान सांगतात, की शबनम खूप मदतशील स्वभावाच्या होत्या. एकदा तिनं कॉलेजमध्ये माझी फीसपण भरली होती. बावानखेडी हत्याकांडानंतर त्याच्या बातम्या आल्या तेव्हापासून मी शबनमला तुरुंगात भेटण्याचे प्रयत्न करत होतो.' उस्मान सांगतात, 'मी अडीच वर्ष 24 वेळा जेलमध्ये शबनमला भेटण्याचे प्रयत्न केले. दरवेळी अयशस्वी झालो. एकदा मात्र यशस्वी झालो. मी तिच्या मुलाला दत्तक घेण्याचा निश्चय केला.

Hijab Compulsion: मुस्लीम नसाल तरी या देशात घालावा लागतो हिजाब, आता बदलणार 60 नियम

उस्मान सांगतात, 'मी जैदचा लीगल गार्डियन बनण्यासाठी बऱ्याचदा अर्ज केले. मात्र प्रत्येकवेळी अर्ज रद्द झाले. त्यामागे कारण हे सांगितलं जायचं, की अविवाहित व्यक्तीला मूल दत्तक देता येऊ शकणार नाही.' उस्मान म्हणतात, 'यानंतर मी लग्न करण्याचा निश्चय केला. अनेक मुलींना भेटलो. पण प्रत्येक वेळा जैदच्या कारणावरून लग्न करण्याची गोष्ट फिसकटत असे.' मग उस्माननं त्याची मैत्रीण वंदनाच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ती तयार झाली. मग उस्माननं निकाहची कागदपत्रं बनवत अर्ज दिला.

उस्मान सांगतात, 'सुरवातीला शबनमसुद्धा आम्हाला मुलगा दत्तक देण्यासाठी नकार देत होती. मात्र नंतर आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि ती तयार झाली. वंदना सांगतात, 'जैद आमच्याकडे राहायला आल्यावर आम्ही दुसऱ्यांदा त्याला शबनमला भेटवायला घेऊन गेलो तेव्हा तो तिच्याकडे गेलाच नाही. तो म्हणाला, की जेलमध्ये येणारा वास त्याला आवडत नाही. त्याला भीती वाटायची. तो प्रत्येक गोष्टीला वेगळ्या नजरेनं पहायचा. आम्ही जैदला घरी आणलं तेव्हा त्याला म्हैस कशी असते हेसुद्धा माहीत नव्हतं. अनेक साध्या गोष्टीही त्याला माहीत नव्हत्या. आता तो 12 वर्षांचा झाला आहे. मात्र अजूनही लहानच आहे. तो एखाद्या टीनएजरसारखा वागत नाही.'

हेही वाचा गंभीर आजाराचा सामना करतीये 'ही' चिमुकली, लिंबू पाणी विकून उपचारासाठी जमवते पैसे

बुलंदशरमध्ये उस्मान-वंदनाच्या घरी गेल्यावर जैद बाहेर मुलांसोबत खेळत होता. सामान्य दिसणारा जैद कॅमेरा पाहिल्यावर अस्वस्थ होतो. बातमीदारानं बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तो म्हणाला, 'तुम्हीही तेच प्रश्न विचाराल जे बाकीचे विचारतात.' त्या बातमीदार म्हणाल्या, की मी तुला फक्त तुझ्या हॉबीजविषयी विचारें तेव्हा तो तयार झाला. जैदला डान्स करणं, गाणं म्हणणं आणि खेळणं आवडतं. तो म्हणाला, की त्याला भुतांची भीती वाटते. त्यानं कधी भूत पाहिलं आहे का असं विचारल्यावर तो म्हणाला, 'मी लहान होतो तेव्हा जेलमध्ये एक पागल आंटी होत्या. त्या बाथरूममध्ये उलटं लटकायच्या. त्यांना पाहून भीती वाटायची. तेव्हापासून मी भुताला घाबरतो.'

जैद सांगतो, 'जेलमध्ये काहीच चांगलं नव्हतं. केवळ दोन जेलरकाका चांगलं बोलायचे. बडी अम्मी (शबनम) नेहमी म्हणायची, की चांगला माणूस बन. सगळ्यांची मदत कर. ती माझा अभ्यासपण घ्यायची.' जैद शबनमला बडी अम्मी आणि वंदनाला छोटी अम्मी म्हणतो.' जेलमधून बाहेर उस्मानाच्या घरी आल्यावर सहा वर्षांनी जैद जरा मोकळा झाला. पण आजही त्याला अंधाराची भीती वाटते. वंदना सांगते, 'आजही त्याला एकट्याला गच्चीवर जाणं नको वाटतं. तो एक स्पेशल चाईल्ड आहे. आम्ही त्याची कायम विशेष काळजी घेतली आहे. एक वर्ष त्याचं समुपदेशनही करवून घेतलं आहे.'

आम्हाला शबनमच्या संपत्तीशी काही देणं-घेणं नाही.

माध्यमात फोटो छापून आल्याचंही जैदला वाईट वाटतं. उस्मान सांगतात, 'काही पत्रकार संवाद साधायला आले होते. त्यांनी जैदचे फोटो न छापण्याचं वचन दिलं होतं. पण माध्यमं आणि सोशल मीडियानंही त्याचे फोटो व्हायरल केले. आम्ही खूप अस्वस्थ आहोत. इथं कुणालाच याबाबत माहीत नव्हतं, की हा शबनमचा मुलगा आहे. आता सगळ्यांना माहीत झालं. आम्हाला काळजी ही वाटते, की आता त्याच्या शाळेतून काय प्रतिक्रिया उमटतात.' वंदना म्हणतात, 'शबनमनं जे केलं ते केलं. त्यात जैदची काय चूक? त्याला एक चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याला एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करत आहोत.'

उस्मान आणि वंदनानं स्वतःचं मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. वंदना सांगते, 'मला भीती होती, की मी स्वतःचं मूल जन्माला घातल्यास जैदबाबतचं माझं प्रेम जरा कमी होऊ शकतं. मला हीसुद्धा भीती होती, की मोठा होऊन तो स्वतःला वेगळा पडल्याचं फील करेल. उस्मानालाही हे पटलं.'

हेही वाचा लग्नात दारु पार्टी न ठेवलेल्या नवरीला मिळणार 10 हजार रुपये; पाहा काय आहे ही ऑफर

सध्या तरी शबनमची फाशी टळली आहे. पण भविष्यात झालीच तर बावनखेडी गावात शबानमच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. उस्मान तिचा मृतदेह घेतील असं सांगतात. ते म्हणता, 'आम्ही तिला विचारू, की तिला कुठं दफन होण्याची इच्छा आहे. ती म्हणाले तसंच होईल. तिला देहदान करायचं असेल तर त्याचीही व्यवस्था केली जाईल. शबनम आणि तिच्या मुलाचा हा निर्णय असेल की काय करायचं आहे. आम्ही फक्त साथ देऊ.'

शबनमच्या कुटुंबात तर कुणीच वाचलं नाही, आता तिच्या संपत्तीचं काय होईल? जैदला त्याचा हक्क मिळेल का? यावर उस्मान म्हणता, 'शबनमनं आमच्याकडून वचन घेतलं होतं, की आम्ही जैदला कधीच बावानखेडी इथं घेऊन जाणार नाही. भविष्यातही त्याला कधी तिथं नेणार नाही. आम्हाला संपत्तीशी काही देणं-घेणं नाही. आम्हाला जैद पाहिजे होता, तो मिळाला.'

First published:

Tags: Adoption, Shabnam, Son