मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Hijab Compulsion: मुस्लीम नसाल तरी या देशात घालावा लागतो हिजाब, आता बदलणार 60 नियम

Hijab Compulsion: मुस्लीम नसाल तरी या देशात घालावा लागतो हिजाब, आता बदलणार 60 नियम

हिजाबला मुस्लीम धर्म आजही महत्त्वाचं मानतो. पण इस्लामेतर स्त्रियांनाही असलेली याची अनिवार्यता हटवावी, असं इंडोनेशियाच्या उदारमतवादी सरकारला आता वाटू लागलं आहे.

  • Published by:  News18 Desk

जकार्ता, 1 मार्च : जगात मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणजे इंडोनेशिया (Indonesia hijab compulsion). या देशात 23 कोटी 50 लाख मुस्लीम राहतात. या देशातल्या सरकारने आता जवळपास 20 वर्षांनंतर इस्लामी ड्रेस कोडला प्रोत्साहन देणं बंद केलं आहे. (Indonesia country news) पश्चिम सुमात्रा प्रांताची राजधानी पडांगची मेअर फौजी बाबरनं 2005 मध्ये मुस्लिम महिला आणि विद्यार्थीनींसाठी डोकं, गळा आणि छाती झाकणारा पोशाख अर्थात हिजाब (बुरखा) अनिवार्य केला होता. हा नियम गैर मुस्लिम महिलांनाही लागू केला गेला. आता अनिवार्य हिजाबचा हा नियम काढून टाकावा अशी मागणी होते आहे आणि त्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत देण्याक आली आहे.

अनेक विद्यार्थिनींचा या हिजाब सक्तीला विरोध आहे. इंडोनेशियामध्ये 2001 नंतर स्थानिक सरकारांनी महिलांसाठी डोकं झाकण्यासंदर्भात 60 नियम लागू केले. (Indonesia rules for hijab) 'ह्युमन राईट्स वॉच'च्या अँड्रियास हरसोनोच्या माहितीनुसार, हा नियम न मानणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची पदावनती केली गेली किंवा त्यांना नोकरीवरून काढलं गेलं.(Indonesia girls protest against hijab)

हेही वाचा 1st March 2021: आजपासून बदलणार हे नियम, वाचा सामान्यांच्या जीवनात काय होणार बदल

त्यांच्या म्हणण्यानुसार, इंडोनेशियामध्ये तीन लाख सरकारी शाळांपैकी बहुतांश शाळांमध्ये मुस्लीम मुलींसाठी हिजाब अनिवार्य आहे. गैरमुस्लिम मुलींनाही बुरखा घालण्यासाठी दबाव आणला जातो. (Indonesia non Muslim woman hijab compulsion) आता मात्र या नियमातून सुटका व्हायची चिन्हं आहेत.

हेही वाचा इमारतीचं खोदकाम सुरू असताना आढळली अकरा फुटाची मगर; परिसरात खळबळ

शिक्षकांना प्रशिक्षित करणारं फाउंडेशन यायासन काहायाचे गुरू हेनी सुपोलो सांगतात, 'अनेक महिला शिक्षकांवर डोकं झाकण्याचा दबाव असतो. अर्थात, केंद्र सरकारचा दृष्टिकोन उदार असतो. केंद्र सरकारनं 3 फेब्रुवारीला सगळ्या प्रांतातील सरकारं आणि शाळेच्या प्राचार्यांना 5 मार्चपर्यंत महिलांच्या हिजाबची अनिवार्यता संपवण्यासाठी वेळ दिला आहे.

First published:

Tags: Indonesia, Muslim