मराठी बातम्या /बातम्या /देश /

लग्नात दारु पार्टी न ठेवलेल्या नवरीला मिळणार 10 हजार रुपये; पाहा काय आहे ही ऑफर

लग्नात दारु पार्टी न ठेवलेल्या नवरीला मिळणार 10 हजार रुपये; पाहा काय आहे ही ऑफर

दारुच्या नशेमध्ये होणारी भांडणं आणि गुन्हेगारी घटना रोखणं हे या योजनेचं खास उद्दिष्ट आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पुरस्काराची रक्कम पोलिस कर्मचारी आपल्या पगारामधून एकत्र जमा करणार आहेत.

दारुच्या नशेमध्ये होणारी भांडणं आणि गुन्हेगारी घटना रोखणं हे या योजनेचं खास उद्दिष्ट आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पुरस्काराची रक्कम पोलिस कर्मचारी आपल्या पगारामधून एकत्र जमा करणार आहेत.

दारुच्या नशेमध्ये होणारी भांडणं आणि गुन्हेगारी घटना रोखणं हे या योजनेचं खास उद्दिष्ट आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पुरस्काराची रक्कम पोलिस कर्मचारी आपल्या पगारामधून एकत्र जमा करणार आहेत.

उत्तराखंड, 1 मार्च : लग्न सोहळ्यामध्ये मजा मस्तीसाठी आजकाल दारु पार्ट्यांचे आयोजन केलं जातं. यामुळे लग्नसोहळ्यात भांडणं, मारामारी यासारख्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि लग्न सोहळ्यामधील दारुचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी उत्तराखंडमधील देवप्रयाग पोलिसांनी खास पुढाकार घेतला आहे. पोलिस प्रशासनानं खासगीरित्या या योजनेला 'भुली कन्यादान योजना' असं नाव दिलं आहे. या योजनेअंतर्गत जी मुलगी आपल्या लग्नामध्ये कॉकटेल पार्टीला विरोध करेल त्या मुलीला देवप्रयाग पोलिसांकडून 10,001 रुपयांची रक्कम भुली कन्यादानाच्या रुपाने पुरस्कार म्हणून दिली जाईल.

दारुच्या नशेमध्ये होणारी भांडणं आणि गुन्हेगारी घटना रोखणं हे या योजनेचं खास उद्दिष्ट आहे. देवप्रयाग पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पुरस्काराची रक्कम पोलिस कर्मचारी आपल्या पगारामधून एकत्र जमा करणार आहेत. देवप्रयाग पोलिस ठाण्याचे अधिकारी महिपालसिंह रावत यांनी पुढाकार घेत ही योजना सुरू केली आहे. ग्रामस्थांनीही यासाठी सहमती दर्शवली असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी राज्यातील चमोलीच्या थराली ब्लॉक आणि पिथोरागडच्या दिहीहाट डिव्हिजनमधील महिलांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. दारुमुळे गावातील तरुणांमध्ये गैरवर्तनाच्या घटना वाढल्या होत्या हे लक्षात घेता त्यांनी दारु बंदीसाठी मोहीम सुरू केली होती. राज्यातील इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या दारुविरोधी मोहीमा राबवल्या जात आहेत.

(वाचा - कोरोना लस मिळेपर्यंत ‘हे करा’ आणि ‘हे करू नका’, गुगलनं सांगितला सुरक्षेचा मंत्र)

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत महिपालसिंह रावत यांनी सांगितलं की, 'राज्यातील डोंगराळ भागामध्ये बूज पार्टी (booze parties) कधीच सामान्य नव्हत्या, मात्र शहरीकरणामुळे खेड्यांमध्ये या पार्ट्या सामान्य झाल्या आहेत. या पार्ट्यांमुळे महिलांसोबत भांडण आणि गैरवर्तनासारख्या घटना वाढत आहेत.' तसंच, 'आम्ही टाकलेलं पाऊल अशाप्रकराच्या घटनांना प्रतिबंध घालेल अशी आशा आहे आणि स्थानिकांना त्यांचे संस्कार आणि संस्कृतीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रेरित करेल.', असं देखील त्यांनी सांगितलं.

(वाचा - लग्नाच्या घरातून तरुणांनी नववधुचं केलं अपहरण; काही तासांनंतर भलताच प्रकार घडला)

त्यांनी पुढे असंही सांगितलं की, 'या प्रकारच्या दारु पार्ट्यांमुळे गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबावर दबाव येतो. ते देखील इतरांप्रमाणे या दारु पार्ट्यांसाठी बरोबरीनं खर्च करतात आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. दरम्यान, दारुविरोधी कृतीस चालना देण्यासाठी सरकारने नवीन विभाग सुरू करावा या मागणीसाठी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी मोर्चासह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. अशी दारुविरोधी मोहीम राबवण्यासाठी खेड्यातील महिला मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहेत. गोपेश्वर इथं महिलांनी दारुच्या दुकानासमोर दारु खरेदीसाठी उभ्या असलेल्यांच्या चेहऱ्याला स्टिग्नी गवत फासलं होतं.

First published:

Tags: Uttarakhand