मराठी बातम्या /बातम्या /देश /शबनमची फाशी पुन्हा टळली; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला होणार होता मृत्युदंड

शबनमची फाशी पुन्हा टळली; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला होणार होता मृत्युदंड

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा होणार होती. काय आहे हे नेमकं प्रकरण? शबनमची फाशी का टळली? जाणून घ्या..

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा होणार होती. काय आहे हे नेमकं प्रकरण? शबनमची फाशी का टळली? जाणून घ्या..

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा होणार होती. काय आहे हे नेमकं प्रकरण? शबनमची फाशी का टळली? जाणून घ्या..

अमरोहा, 23 फेब्रुवारी:  स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा होणार होती. त्यासाठी उत्तर प्रदेशातल्या एकमेव कारागृहात जिथे महिलांना फाशी देण्याची सोय आहे, तिथे तयारीही सुरू झाली होती. पण आता पुन्हा एकदा शबनमची फाशी टळली आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? शबनमची फाशी का टळली? जाणून घ्या..

उत्तर प्रदेशातील अमरोह्यातील (Amroha) बावनखेडी हत्याकांडाताली (Bawankhedi Murder Case) दोषी शबनमची (Shabnam) फाशीची शिक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. अमरोहा जिल्हा न्यायालयानी अभियोजन पक्षाकडे खुनी शबनमची माहिती मागवली होती. पण शबनमच्या वकिलांनी राज्यपालांसमोर दया याचिका दाखल केली. पुन्हा एकदा दया याचिका दाखल झाल्यामुळे शबनमच्या फाशीची तारीख न्यायालयाला निश्चित करता आली नाही आणि तिची फाशी पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आहे.

मंगळवारी जिल्हा न्यायालयात शबनमच्या फाशीसंबंधी सुनावणी झाली. आधीपासून लोकांना असं वाटत होतं की जिल्हा न्यायालयासमोर शबनमच्या गुन्ह्याचा अहवाल सादर केला जाईल आणि त्यात जर कोणतीही याचिका प्रलंबित नसेल तर जिल्हा न्यायाधीश फाशीची तारीख निश्चित करतील. पण शबनमच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राज्यपालांकडे दया याचिका करून माफीची विनंती केली होती आणि जिल्हा तुरुंगाला आपला अर्ज दिला होता. आजच्या सुनावणीदरम्यान याचा उल्लेख झाला त्यामुळेच शबनमच्या फाशीची तारीख निश्चित करता आली नाही.

असं आहे प्रकरण

14 व 15 एप्रिल 2008 दरम्यानच्या रात्री शबनमने आपला प्रियकर सलीम याच्या साथीने तिच्या घरातील 7 जणांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली होती. या प्रकरणात सामान्य न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयाने या दोघांनाही फाशीची शिक्षा कायम ठेवली. सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेली फेरविचार याचिकाही डिसेंबर 2020 मध्ये फेटाळण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनीही शबनमची दया याचिका अमान्य केली होती. पण नैनी तुरुगांत असलेल्या सलीमच्या दया याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.

अवश्य वाचा -  ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय

सीबीआय तपासाची मागणी

गेल्या आठवड्यात आपल्या 12 वर्षांच्या मुलाला भेटल्यावर शबनम ढसाढसा रडली आणि या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी तिने केली. आपला मुलगा ताज याला शबनमनी सांगितलं की त्यानी वाईट गोष्टींपासून दूर राहून चांगला माणूस व्हावं अशी तिची इच्छा आहे. ताजची काळजी घेणाऱ्या उस्मानी सैफी  यांनी रामपूर जेलमध्ये तिची भेट घेतली तेव्हा तिनी प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी त्यांच्याकडे केली होती.

First published:
top videos

    Tags: Shabnam, Up Police, Uttar pardesh