दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक गुडन्यूज दिला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या करारावर आज अखेर स्वाक्षरी झाली. दक्षिण आफ्रिकेतून आता भारतात चित्ते येणार आहेत. एकूण 12 चित्ते भारतात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात 12 चित्त्यांसाठी करार झाला आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात नामिबिया इथून भारतात पाच मादी आणि तीन नर चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहेत. सध्या त्यापैकी एका मादी चित्त्याची तब्येत बिघडली असून कुनो राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांमध्ये चिंता आहे. या चित्त्यांमुळे भारतात पर्यटन वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतचा 12 चित्त्यांचा करार करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील कुनो इथे सफारी पर्यटन वाढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. चित्त्यांसाठी आवश्यक असणारी जागा आणि वातावरण कुनो इथे असल्याने त्यांना तिथे ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा दिसणार चित्ता, पण देशात शेवटच्या चित्त्याची शिकार कुणी केली?हे चित्ते साधारण फेब्रुवारी महिन्यात येतील अशी चर्चा आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. रॉटर्सने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेसोबत 12 चित्त्यांना भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
South Africa signs an agreement with India to introduce dozens of African cheetahs in India over the next decade, reports Reuters pic.twitter.com/yQHudHUvd8
— ANI (@ANI) January 27, 2023
या 12 चित्त्यांपैकी 7 नर आणि 5 मादा असल्याची चर्चा आहे. आता हे चित्ते भारतात कधी आणि कसे आणली जाणार याबाबत उत्सुकता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन क्षेत्राबाबत बोलताना यावर काही निर्णय होणार का हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.