मराठी बातम्या /बातम्या /देश /भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा दिसणार चित्ता, पण देशात शेवटच्या चित्त्याची शिकार कुणी केली?

भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा दिसणार चित्ता, पण देशात शेवटच्या चित्त्याची शिकार कुणी केली?

भारतात सध्या एकही चित्ता (Cheetah) नाही आणि आपल्या देशात तब्बल 70 वर्षांनंतर चित्ते पुन्हा पाहायला मिळणार आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) 6 आफ्रिकन चित्ते भारतात आणले जाणार आहेत.

भारतात सध्या एकही चित्ता (Cheetah) नाही आणि आपल्या देशात तब्बल 70 वर्षांनंतर चित्ते पुन्हा पाहायला मिळणार आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) 6 आफ्रिकन चित्ते भारतात आणले जाणार आहेत.

भारतात सध्या एकही चित्ता (Cheetah) नाही आणि आपल्या देशात तब्बल 70 वर्षांनंतर चित्ते पुन्हा पाहायला मिळणार आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) 6 आफ्रिकन चित्ते भारतात आणले जाणार आहेत.

  मुंबई, 30 जून : भारतात सध्या एकही चित्ता (Cheetah) नाही आणि आपल्या देशात तब्बल 70 वर्षांनंतर चित्ते पुन्हा पाहायला मिळणार आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) 6 आफ्रिकन चित्ते भारतात आणले जाणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान याबद्दलचा करार झाला आहे. या चित्त्यांना मध्य प्रदेशातल्या चंबळ नदीच्या परिसरात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) ठेवण्यात येणार आहे. या महिन्यापासून कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांना ठेवण्यासाठी तयारी सुरू झाली असून, ते ऑगस्टमध्ये पूर्ण होईल. याशिवाय नाम्बियामधून काही चित्ते आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

  आफ्रिकन चित्ते आशियाई चित्त्यांपेक्षा वेगळे असतात. गेल्या 70 वर्षांपासून भारतात चित्ते नाहीत. परंतु आधी भारतात किती चित्ते होते आणि भारतातले शेवटचे काही चित्ते कसे मारले गेले, याबद्दल जाणून घेऊ या.

  चित्ता हा जगातला सर्वांत वेगाने धावणारा प्राणी आहे. तो ताशी 112 किलोमीटर्स वेगाने धावू शकतो. पूर्ण ताकदीने धावल्यानंतर चित्ता सात मीटरपर्यंत उडी मारू शकतो. चित्त्यांना रात्री नीट दिसत नसल्याने ते दिवसा शिकार करतात. सध्या जगभरात 7100 चित्ते आहेत.

  - चित्ते भारतात राहू शकतील का?

  - आता आफ्रिकेतून आणले जाणारे चित्ते भारतात राहू शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाइम्सच्या वृत्तानुसार, काही तज्ज्ञांच्या मते, चित्त्यांना इथं जगण्यात अडचणी येऊ शकतात. खरं तर आफ्रिकेत सिंहांकडून शिकार होत असल्यामुळे, तसंच इतर कारणांमुळे चित्ते मारले जात आहेत. चित्त्यांना राहण्यासाठी किमान 10 हजार चौरस किलोमीटर क्षेत्राची आवश्यकता असते आणि त्यांच्या संरक्षणासाठी एवढी जमीन देणं फार कठीण आहे. त्यामुळे हे आफ्रिकन चित्ते इथं जगू शकतात की नाही, ते येत्या काळातच कळेल.

  - भारतात चित्ते होते का?

  - होय. भारतात इंग्रज सत्तेत असताना चित्ते होते. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी म्हणजेच 1947 मध्येच देशातला शेवटचा चित्ता मारला गेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर 1952 मध्ये भारत सरकारने चित्ता देशातून नामशेष झाल्याचं घोषित केलं. चित्ता हा शिकार आणि अधिवासाच्या समस्येमुळे नामशेष झालेला देशातला एकमेव प्रमुख मांसाहारी प्राणी आहे. टाइम्सच्या एका विशेष वृत्तानुसार, मुघल शासक अकबरने त्या वेळी सुमारे 1000 चित्त्यांचं संरक्षण केलं होतं आणि त्यांची संख्या त्याहूनही अधिक होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्येही ही बाब समोर आली आहे.

  - भारतातून चित्ते कधी नामशेष झाले?

  - पूर्वीच्या काळी राजघराण्यातल्या व्यक्ती शिकार करत असत. 1947 मध्ये तेव्हाच्या कोरियाचे (आताचे छत्तीसगड) महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातल्या शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली आणि चित्ता भारतातून नामशेष झाला, असं म्हटलं जातं. यानंतर सरकारने 1952 मध्ये चित्ता नामशेष झाल्याचं घोषित केलं. तेव्हापासून भारतात एकही चित्ता नाही. यानंतर बाहेरच्या देशातून चित्ते आणून ते कुनो-पालपूरमध्ये ठेवण्याची योजना 2009 मध्ये सरकारने आखली. त्याला 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मंजुरी मिळाली आणि चित्त्यांना दुसऱ्या देशातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.

  First published:
  top videos