Home /News /national /

...म्हणून कुटुंबातील सर्वांचा केला खेळ खल्लास; हत्यारोपी मुलाचे धक्कादायक खुलासे

...म्हणून कुटुंबातील सर्वांचा केला खेळ खल्लास; हत्यारोपी मुलाचे धक्कादायक खुलासे

हत्या झालेलं कुटूंब

हत्या झालेलं कुटूंब

Son Killed Whole Family: लिंग परिवर्तन करण्यासाठी विरोध केल्यानं आरोपीनं आपल्याच कुटुंबातील सर्वांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना संपवलं होतं. याप्रकरणी आरोपीनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

    रोहतक, 05 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी एका तरुणानं नियोजन पूर्ण पद्धतीनं आपल्याच घरातील चार जणांची निर्घृण हत्या (4 murder in same family by son) केली होती. लिंग परिवर्तन करण्यासाठी विरोध केल्यानं (Oppose to change gender) आरोपीनं आपल्याच कुटुंबातील सर्वांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना संपवलं होतं. त्यानं नियोजनपूर्व प्लॅन करून सर्वांना संपवलं होतं. पण उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मागील पाच दिवसांपासून पोलीस कोठडीत असणाऱ्या तरुणानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीला रविवारी न्यायालयात पुन्हा हजर केलं जाणार आहे. चौकशी दरम्यान आरोपीला आपल्या कुटुंबाला संपवल्याचं कसलंही दु:ख नव्हतं. पण त्याला आपल्या पुरुष प्रियकराची आठवण आल्यास तो ओक्साबोक्शी रडायचा अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाच दिवसांच्या रिमांड कालावधीत आरोपी मुलगा अभिषेक एकदाही आपल्या कुटुंबासाठी रडला नाही. पण आपल्या पुरुष प्रियकराला भेटण्यासाठी त्यानं अनेकदा पोलिसांकडे विनवणी केली आहे. संबंधित घटना हरियाणातील रोहतक येथील आहे. हेही वाचा-लग्नाचं आमिष दाखवून युवतीचं लैंगिक शोषण; भाजप खासदाराच्या मुलाचं धक्कादायक कृत्य एवढंच नव्हे तर, 'मला कोणत्याही तुरुंगात कितीही काळ ठेवा, फक्त एकच विनंती आहे की माझ्यासोबत माझा पुरुष मित्र असायला हवा, अशा प्रकारे तो सतत आपल्या पुरुष प्रियकराला भेटण्यासाठी विनवणी करत होता. या सर्व गोष्टी पोलिसांनी आपल्या कागदोपत्री कारवाईत नमूद केल्या आहेत. तसेच आरोपी अभिषेक आपल्या पुरुष प्रियकरासोबत लिव्ह इन मध्ये राहत होता. दरम्यान त्यानं अनेकदा शारीरिक संबंध देखील ठेवल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. यामुळेच संपूर्ण आयुष्य सोबत घालवण्यासाठी त्याला लिंग परिवर्तन करायचं होतं. त्यामुळे त्यानं कुटुंबीयांकडे 5 लाख रुपये मागितले होते. पण कुटुंबानं याला विरोध करत त्याचे खर्चाचे पैसेही बंद केले होते. शिवाय सर्व संपत्ती मृत बहिण तमन्नाच्या नावे करण्याची धमकी मिळत होती. हेही वाचा-गळा दाबून गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ; मुंबईतील फौजदाराचं धक्कादायक कृत्य यातूनच आरोपी अभिषेकनं 27 ऑगस्ट रोजी घरातील आई, वडील, बहिणी आणि आजीची हत्या केली आहे. यानंतर आरोपीनं आपल्या मित्रांसमेवत जाऊन मर्डर पार्टी केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. कुटुंबाची हत्या करण्यापूर्वी आरोपी दोन दिवस आपल्या मित्रासोबत एका हॉटेलमध्ये थांबला होता. तसेच त्यानं अनेकदा घराची रेकी केली होती. तसेच दोन वेळी हत्या करण्याची अपयशी प्रयत्न देखील केल्याचं आरोपीनं सांगितलं आहे. हेही वाचा-चहा मागितल्यानं सासूला जबरी शिक्षा; बुलडाण्यातील सुनेचं अमानुष कृत्य आलं समोर मर्डर पार्टी केल्यानंतर आरोपीनं घरी जाऊन कोणीतरी आपल्या कुटुंबाची हत्या केल्याचा बनाव रचला होता. तसेच अन्य नातेवाईक आणि कुटुंबीयांसमोर तो ओक्साबोक्शी रडतही होता. पण त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं त्याचं बिंग फुटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिषेकचा मामा प्रविण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या