• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • चहा मागितल्यानं सासूला दिली जबरी शिक्षा; बुलडाण्यातील सुनेचं अमानुष कृत्य आलं समोर

चहा मागितल्यानं सासूला दिली जबरी शिक्षा; बुलडाण्यातील सुनेचं अमानुष कृत्य आलं समोर

कौशल्याबाई देशमुख असं जखमी झालेल्या 77 वर्षीय सासूबाईंचं नाव आहे. (प्रातिनिधीक फोटो)

कौशल्याबाई देशमुख असं जखमी झालेल्या 77 वर्षीय सासूबाईंचं नाव आहे. (प्रातिनिधीक फोटो)

Crime in Buldhana: खामगाव येथील एका सुनेनं किरकोळ कारणातून आपल्या आईसमान असणाऱ्या सासूला जबरी शिक्षा (daughter in law beat mother in law) दिली आहे.

 • Share this:
  खामगाव, 04 सप्टेंबर: सासूनं सुनेचा छळ किंवा सुनेनं सासूचा छळ केल्याच्या अनेक घटना सतत समोर येत असतात. अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी घडली आहे. एका किरकोळ कारणातून सुनेनं आपल्या आईसमान असणाऱ्या सासूला जबरी शिक्षा (daughter in law beat mother in law) दिली आहे. केवळ चहा मागितल्याच्या कारणातून (Ask tea to daughter in law) सुनेनं सासूला शिवीगाळ करत तिच्या डोक्यात काठीनं वार केला आहे. या हल्ल्यात सासूबाईंचं डोकं फुटलं आहे. या प्रकरणी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कौशल्याबाई देशमुख असं जखमी झालेल्या 77 वर्षीय सासूबाईंचं नाव आहे. तर रेखा निलेश देशमुख असं सासूबाईवर हल्ला करणाऱ्या आरोपी सुनेचं नाव आहे. संबंधित घटना खामगाव येथील शिवाजी वेस परिसरात 1 सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जखमी कौशल्याबाई यांचा मुलगा गजानन देशमुख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा-भाडं मागितल्यानं भाडेकरूची सटकली; घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं नेमकं काय घडलं? 77 वर्षीय कौशल्याबाई देशमुख यांनी 1 सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास सुनबाई रेखा यांना चहा मागितला. यावेळी आरोपी सुनबाई रेखा हिने चहा देत नाही म्हणत, शिवीगाळ करायला सुरूवात केली. शिवीगाळ का करते? असं सासूनं विचारलं असता, सुनेनं जवळच पडलेल्या एका काठीनं सासूबाईच्या डोक्यात वार केला. या घटनेत सासूबाईचं डोकं फुटलं आहे. केवळ चहा मागितला म्हणून सुनेनं दिलेल्या या अमानुष शिक्षेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- एका टॅटूमुळे मारेकरी गजाआड; कल्याणमधील तलावात आढळलेल्या मृतदेहाच गूढ उलगडलं आईला सुनेनं केलेली मारहाण पाहून मुलगा गजानन देशमुख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या वहिनीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गजानन देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजी नगर पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचाराच्या कलमासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: