मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /गळा दाबून गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ; मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

गळा दाबून गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ; मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

आरोपी पोलीस अधिकारी हा मुंबई याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. (File Photo)

आरोपी पोलीस अधिकारी हा मुंबई याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. (File Photo)

Crime in Mumbai: मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून तिच्या पोटावर लाथ मारल्याची (Police Officer beat Pregnant wife) धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.

सोलापूर, 04 सप्टेंबर: मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून तिच्या पोटावर लाथ मारल्याची (Police Officer beat Pregnant wife) धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यानं फिर्यादीच्या पोटात जोरात लाथ मारल्यामुळे (kicked on pregnant wife's abdomen) रक्तस्त्राव होऊन तिचा गर्भपात (Abortion) झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं विजापूर नाका पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस करत आहेत.

आरोपी पोलीस अधिकारी हा मुंबई याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. 'तुझ्या गर्भात वाढणारं बाळ माझं नाही. ते काढून टाक. तुझं बाहेर कोणाबरोबर तरी संबंध आहेत, असं म्हणत आरोपीनं आपल्या पत्नीचा गळा दाबून तिच्या पोटावर जोरात लाथ मारली आहे. या मारहाणीमुळे पीडित महिलेचा रक्तस्त्राव होऊन तिचा गर्भपात झाला आहे. यानंतर आरोपीनं पीडितेला तिच्या माहेरी सोलापूर याठिकाणी आणून सोडलं आहे. दरम्यान आरोपीनं पीडितेच्या आई- वडिलांना शिवीगाळही केली आहे.

हेही वाचा-...मग डोक्यात एकच घाव कसा? जन्मदात्याच्या हत्येच्या प्रकरणात मुलाचं फुटलं बिंग

पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेचं 2020 साली मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी विवाह झाला होता. दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे मोठ्या थाटात हा विवाह संपन्न झाला होता. लग्नानंतर आरोपी आपल्या पत्नीला घेऊन मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहायला आला. याठिकाणी काही दिवस आरोपीनं पत्नीला चांगलं वागवलं.

हेही वाचा-एका टॅटूमुळे मारेकरी गजाआड; कल्याणमधील तलावात आढळलेल्या मृतदेहाच गूढ उलगडलं

पण त्यानंतर, सासू, सासरे, दीर हे छोट्या छोट्या कारणांवरून तिला त्रास देऊ लागले. दरम्यान दीरानं वाईट हेतूनं आपला विनयभंग केल्याचा दावाही पीडित महिलेनं केला आहे. त्यानंतर एके दिवशी आरोपी पोलीस अधिकाऱ्यानं चारित्र्यावर संशय घेत महिलेला मारहाण केली आहे. तसेच तिच्या पोटावर जोरात लाथ मारून तिचा गर्भपात घडवून आणला आहे. याप्रकरणी पीडितेन विजापूर नाका पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Solapur