मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अधिक धोका, राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू 

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अधिक धोका, राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू 

Maharashtra Strict Restriction: राज्य सरकारने राज्यातील निर्बंधासंदर्भात नवीन आदेश जारी केले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन निर्बंध.

Maharashtra Strict Restriction: राज्य सरकारने राज्यातील निर्बंधासंदर्भात नवीन आदेश जारी केले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन निर्बंध.

Maharashtra Strict Restriction: राज्य सरकारने राज्यातील निर्बंधासंदर्भात नवीन आदेश जारी केले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन निर्बंध.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 25 जून: दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं (Delta plus variant)डोकं वर काढलं आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण (India on Wednesday confirmed 40 cases)आढळून आलेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिडळाच्या (State Cabinet) बैठकीत राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू (Restrictions Across The States) करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यानुसार आज डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील निर्बंधासंदर्भात नवीन आदेश जारी केले आहेत. (Maharashtra govt has issued new orders) राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. तसंच बाजारपेठांमध्येही तुफान गर्दी करताना नागरिक दिसताहेत. त्यामुळे डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचा- सावध व्हा; चिंता वाढवणारी बातमी, आरोग्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती जाणून घ्या काय आहे नव्या आदेशात कोरोना व्हायरसचा धोका राज्यात वाढत आहे. 21 जूनरोजी डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची राज्यात नोंद झाली. तसंच राज्यात तिसऱ्या लाटेता धोकाही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे कोविड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लागू करण्यात येताहेत. आदेशात पुढे म्हटलं आहे की, रत्नागिरी, जळगाव आणि इतर जिल्ह्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वसाधारणपणे कठोर निर्बंधांची आवश्यकता आहे. सध्या राज्यातील परिस्थिती पाहता, व्हायरसमधील बदल आणि नव्या व्हेरिएंटमुळे कठोर निर्बंध आवश्यक आहेत. टास्क फोर्सच्या निष्कर्षानंतर पूर्वीच्या आदेशामध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. लागू होणाऱ्या निर्बंधामध्ये आता आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांच्या आधारावरच निश्चित केला जाईल. रॅट किंवा इतर चाचण्या ग्राह्य धरण्यात येणार नाही. जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणं. तसंच पात्र असलेल्या नागरिकांचं 70 टक्के लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट- ट्रॅक- ट्रिट अशी उपचार पद्धती अंमलात आणावी. हेही वाचा- ''जेलमध्ये जाणारच...अनिल देशमुख छगन भुजबळ यांच्या मार्गावर'', भाजप नेत्याचं धक्कादायक विधान आरोग्य विभागानं म्हणण्याप्रमाणे, इतर चाचण्यांपेक्षा आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा. कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करा. गर्दी, समारंभ, कार्यक्रम, लग्न सोहळे येथे जाणं टाळा. शहरातल्या ज्या क्षेत्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे तिथे कंटेन्मेंट झोन जाहीर करा. कोरोनाची ब्रेक द चेन यासाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra

पुढील बातम्या