Home /News /pune /

पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री गैरहजर, चर्चांना उधाण

पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री गैरहजर, चर्चांना उधाण

Ajit Pawar News: पुण्यातील कोरोना (Pune Corona Virus) परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली.

    पुणे, 25 जून: पुण्यातील कोरोना (Pune Corona Virus) परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. आजच्या आढावा बैठकील उपमुख्यमंत्री (Deputy Cm Ajit Pawar) आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गैरहजर होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली. (Pune Corona Review Meeting) बैठकीला पालकमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. कालच वाझे प्रकरणात अजित पवार यांची CBI चौकशीची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक अजित पवारांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जातंय. हेही वाचा- पुणेकरांनो लक्ष द्या! सोमवारपासून कसे असतील निर्बंध, वाचा सविस्तर नेमकं काय आहे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची जवळीक असल्याचा राजकीय चर्चा होत आहेत.अजित पवार यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या (BJP meeting) प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे, अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारविरोधात आणखी आक्रमकपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ajit pawar, Coronavirus, Pune, Pune ajit pawar

    पुढील बातम्या