मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिवाळीआधी देशात घातपाताचं संकट; 46 रेल्वेस्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

दिवाळीआधी देशात घातपाताचं संकट; 46 रेल्वेस्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांवर बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी...

लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांवर बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी...

कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने (Lashkar-e-Toiba) रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक धमकीचं पत्र पाठवलं आहे. संबंधित पत्रातून देशातील विविध रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी (threat to bomb blast at railway stations) दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
लखनऊ, 01 नोव्हेंबर: कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने (Lashkar-e-Toiba) रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक धमकीचं पत्र पाठवलं आहे. लष्कर-ए-तोयबाच्या एरिया कंमाडरच्या (Area Commander letter) नावाने आलेल्या या पत्रात दिपावलीच्या तोंडावर देशातील विविध रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोट (threat to bomb blast at 46 railway stations) घडवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित रेल्वे स्थानकांमध्ये लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर, रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर, लखनऊ, कानपूरसह संबंधित सर्व रेल्वे स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी आणि श्वान पथकासह सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तूंची कसून तपासणी केली जात आहे. खरंतर, अशाप्रकारे रेल्वे प्रशासनाला धमकी मिळाल्याची पहिलीच घटना नाही. यापूर्वीही देखील रेल्वे स्थानकं उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. असं असलं तरी या धमकीची गांभीर्याने दखल घेतली जात असून, सतर्कता बाळगली जात आहे. हेही वाचा-G20 Summit: भारताला मोठं यश, शेतकरी आणि हवामान बदलासह या मुद्द्यांकडे वेधलं लक्ष लष्कर-ए-तोयबाच्या एरिया कमांडरच्या नावानं पाठवलं पत्र रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लष्कर-ए-तोयबाच्या एरिया कमांडरच्या नावानं हे पत्र पाठवण्यात आलं आहे. संबंधित पत्रात उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधी 2018 मध्ये देखील दहशतवादी संघटनेने अशाप्रकारची धमकी दिली होती. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर, संबंधित रेल्वे स्थानकात येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हेही वाचा-पाच महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, 'या'मुळे पत्नीच्या भावानं डोक्यात घातली गोळी विशेष खबरदारीच्या सूचना धमकीचं पत्र मिळाल्यानंतर, रेल्वे स्थानकावर कोणीही संशयास्पद वाटल्यास त्याची कसून तपासणी करण्याच्या सूचना आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, असंही आदेशात म्हटलं आहे. दिवाळी सणाच्या दरम्यान ट्रेनमध्ये प्रवाशांची खूप गर्दी असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनासह सुरक्षा दलाची चिंता वाढली आहे.
First published:

Tags: Crime news, Uttar pradesh

पुढील बातम्या