मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

विदारक! पोलिसांच्या ताब्यात असताना विवाहितेचा मृत्यू, हुंडाबळीची करूण कहाणी

विदारक! पोलिसांच्या ताब्यात असताना विवाहितेचा मृत्यू, हुंडाबळीची करूण कहाणी

पोलिसांच्या ताब्यात असतानाच (Death of a newly married woman in police custody) एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असतानाच (Death of a newly married woman in police custody) एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असतानाच (Death of a newly married woman in police custody) एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

  • Published by:  desk news
मोतिहारी, 31 ऑक्टोबर : पोलिसांच्या ताब्यात असतानाच (Death of a newly married woman in police custody) एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून पोलिसांत फिर्याद देण्यासाठी गेलेल्या (Police kept her at female police staion) महिलेला पोलिसांनी महिला स्टेशनला ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तिथं तिची तब्येत बिघढल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेनं परिस्थितीला कंटाळून विषप्राशन करत (woman consumes poison) आत्महत्या केल्याचा आऱोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. काय आहे प्रकरण बिहारमधील मोतिहारीमध्ये राहणाऱ्या श्रेया शर्माचं केवळ दोनच महिन्यांपूर्वी राहुल सिंह याच्याशी लग्न झालं होतं. लग्नापूर्वी काही महिन्यांपासून दोघांचं अफेअर होतं आणि दोघांनी परस्पर सहमतीनं प्रेमविवाह करून नव्या संसाराला सुरुवात केली होती. मात्र लग्न झाल्यावर परिस्थिती अचानक बदलली. श्रेयाच्या सासरच्या मंडळीनी तिच्याकडे हुंड्यासाठी तगादा सुरू केला. श्रेयाची पोलिसांत धाव सतत हुंड्याची मागणी आणि त्यापोटी होणाऱ्या छळाला कंटाळत श्रेयानं पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तिची तक्रार ऐकून घेतल्यानंतर तिला महिला पोलीस ठाण्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर तिची तब्येत बिघढली आणि पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं.उपचारादरम्यान तिने विष खाल्लं आणि तिची तब्येत अधिक खालावली. विषप्राशन केल्यामुळे श्रेयाचा मृत्यू झाला. श्रेयाच्या आईचे आरोप सासरच्या मंडळींनी सतत हुंड्यासाठी छळ केल्यामुळेच आपल्या मुलीचा जीव गेला, असा आरोप तिच्या आईने केला आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला आपल्या मुलीच्या तक्रारीची गांभिर्यानं दखल घेतली नसल्याचाही हा परिणाम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुलीच्या तक्रारीकडं आणि त्यानंतर तिच्या तब्येतीकडंही दुर्लक्ष झाल्यामुळे तिचा जीव गेल्याचा दावा तरुणच्या आईनं केला आहे. हे वाचा- इंदिरा गांधी पुण्यतिथी : 'आयर्न लेडी'ने घेतलेले 10 मोठे निर्णय आणि त्याचे परिणाम पोलिसांची कारवाई पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेण्याचं काम सुरू केलं असून लवकरच आऱोपींना अटक केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
First published:

Tags: Bihar, Crime, Police

पुढील बातम्या