मराठी बातम्या /बातम्या /देश /शिवसेनेत मोठ्या बदलाचे संकेत, पक्ष प्रमुखपदी रश्मी ठाकरेंच्या नावाची रंगली जोरदार चर्चा

शिवसेनेत मोठ्या बदलाचे संकेत, पक्ष प्रमुखपदी रश्मी ठाकरेंच्या नावाची रंगली जोरदार चर्चा

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती असणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती असणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती असणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली, 5 जानेवारी : शिवसेना पक्षात पक्षप्रमुख (Shiv Sena Party President) बदलण्याचे संकेत मिळत आहेत. पक्ष प्रमुख म्हणून रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे नाव सर्वात पुढे असून पक्षप्रमुख बदलण्याच्या संदर्भातला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेतील असे शिवसेना नेते स्पष्टपणे सांगत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते घरातूनच कामकाज पाहत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र मुख्यमंत्री व पक्षप्रमुख या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना उद्धव ठाकरे यांची तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळेच पक्षप्रमुख बदलाचे वारे शिवसेनेत वाहायला सुरुवात झाली आहे.

शिवसेनेत विचारमंथन सुरू

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती असणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आदित्य ठाकरे यांचे वय बघता आणि त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचा लेखाजोखा मांडल्यानंतर रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावाला कोणाचाही विरोध असण्याची शक्यता धूसर आहे. शिवसेना पक्षात यासंदर्भात विचारमंथन सुरू झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

वाचा : "....तर शिवसेना-BJPची पुन्ही युती" शिवसेना मंत्र्याचं मोठं विधान, चर्चांना उधाण

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर सामनाची संपूर्ण जबाबदारी ही रश्मी ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आली. गेल्या अडीच वर्षापासून रश्मी ठाकरे या सामनाच्या प्रत्येक विषयांमध्ये निर्णय घेताना महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संजय राऊत यांच्यासोबत त्या सामनासाठी विविध पातळीवर ती निर्णय प्रक्रियेत सहभागी होताना देखील पाहायला मिळत आहे.

बीएमसी निवडणुकीपूर्वी निर्णयाची शिवसैनिकांना अपेक्षा

महत्त्वाचं म्हणजे राज्यात महाविकास आघाडीची मुहूर्त मेढ ठेवताना रश्मी ठाकरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली याची माहिती राजकीय विश्लेषण देतात. सोबतच ज्या पद्धतीने आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, त्यापूर्वी पक्षप्रमुख बदण्याच्या संदर्भातला निर्णय व्हावा अशी शिवसैनिकांना अपेक्षा आहे.

वाचा : चंद्रकांत पाटील म्हणतात, "उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज..."

उद्धव ठाकरे आपल्या प्रकृतीमुळे युद्धस्तरावर मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात उतरतील अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख मिळाल्यास एक मोठा बदल शिवसेनेत पहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे कुटुंबामध्ये महिलेला नेहमीच आदर आणि प्रेरणास्थान म्हणून बघितलं गेलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना मोठा मान होता त्यामुळे आता पक्षप्रमुख म्हणून रश्मी ठाकरे यांच्या गळ्यात पक्षप्रमुख पदाची माळ पडते का हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात महिलांचे महत्त्व द्विगुणित होणार आहे.

ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये सध्या महिला आघाडीवर आहेत. त्यांचे देखील महत्त्व या निर्णयानंतर वाढण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे दूरगामी परिणाम होईल अशी देखील शक्यता राजकीय विश्लेषक मांडत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांचे नाव आघाडीवर असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

First published:
top videos

    Tags: Shiv sena, Uddhav thackeray, महाराष्ट्र