मराठी बातम्या /बातम्या /देश /Shiv Sena BJP alliance: पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार?, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विधानाने रंगली चर्चा

Shiv Sena BJP alliance: पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार?, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विधानाने रंगली चर्चा

Shiv Sena BJP alliance: शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्ही युती होणार असल्याची चर्चा आता रंगण्यास सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्याने युतीबाबत केलेलं विधान आहे.

Shiv Sena BJP alliance: शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्ही युती होणार असल्याची चर्चा आता रंगण्यास सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्याने युतीबाबत केलेलं विधान आहे.

Shiv Sena BJP alliance: शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्ही युती होणार असल्याची चर्चा आता रंगण्यास सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्याने युतीबाबत केलेलं विधान आहे.

नवी दिल्ली, 4 जानेवारी : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात निर्माण झालेल्या राजकीय संघर्षानंतर युती (Shiv Sena BJP alliance) तुटली. त्यानंतर शिवसेनेने विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पहायसा मिळत आहे. पण आता पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेलं एक विधान आहे.

राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी न्यूज 18 लोकमत सोबत संवाद साधताना शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य केलं आहे. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येवू शकतात. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचे नाते आहे.

नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. नितीन गडकरी आणि ठाकरे परिवाराचे जवळचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा नितीन गडकरींचा खूप सन्मान करतात, आदर करातत. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर नितीन गडकरी यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंनी मान्य केला तर प्रश्नच मिटेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

वाचा : पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजित पवारांना मोठा झटका, धक्कादायक निकाल आला समोर

आज राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात राज्याचे नुकसान होऊ नये. यामुळे नितीन गडकरी यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला निश्चितच मार्ग निघेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

भाजपची प्रतिक्रिया काय?

राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, मला वाटतं चार दिवस अब्दुल सत्तारांना येथे येऊन झाले आहे. अब्दुल सत्तार यांना कुठल्याही प्रकारची अथॉरिटी नाहीये. अधिकृत भूमिका घेण्याचा अधिकारही अब्दुल सत्तार यांना नाहीये. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, आम्ही नवी मित्र जोडले आहेत आणि त्यांच्यसोबत काम करतोय. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत विसंवाद सुरू असेल किंवा काही गडबड होत असल्याचं दिसत एसेल म्हणून हे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी तर केलं नाहीये? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

अब्दुल सत्तार हेच गंभीर नसतात त्यामुळे त्यांना अजिबात गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये. मीडियासाठी काही तरी खळबळजनक बोलायचं असतं आणि म्हणून ते दोन-चार दिवसांत काही तरी वेगळं बोलत असतात आणि त्याचाच हा प्रकार आहे. त्यांच्या विधानाला गांभीर्याने घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Shiv sena