मराठी बातम्या /बातम्या /देश /

गोणीत सापडले तब्बल 20 माकडांचे मृतदेह; विष दिल्याचा संशय, कर्नाटकातील तिसरी घटना

गोणीत सापडले तब्बल 20 माकडांचे मृतदेह; विष दिल्याचा संशय, कर्नाटकातील तिसरी घटना

एक, दोन नव्हे तर तब्बल 20 माकडांना मारून टाकल्याची भयंकर घटना घडली आहे.

एक, दोन नव्हे तर तब्बल 20 माकडांना मारून टाकल्याची भयंकर घटना घडली आहे.

एक, दोन नव्हे तर तब्बल 20 माकडांना मारून टाकल्याची भयंकर घटना घडली आहे.

कर्नाटक, 01 ऑक्टोबर: माणूस आणि प्राणी यांचं नातं पुरातन आहे. माणूस नेहमीच स्वतःच्या फायद्यासाठी प्राण्यांचा विविध कारणांसाठी उपयोग करत आला आहे. जोपर्यंत प्राण्यांचा उपयोग होतो, त्यांच्यापासून त्रास होत नाही तोपर्यंत माणूस त्यांना जवळ करतो; मात्र काही त्रास झाला तर अत्यंत निर्दयपणे या प्राण्यांना संपवण्यास मागे पुढे पाहत नाही. गेल्या काही काळात प्राण्यांच्या (Animals) नैसर्गिक अधिवासावर (Natural Habitat) मानवानं आक्रमण केल्यानं प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे माणसांना त्यांचा उपद्रव होऊ लागल्यानं प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी नानाविध उपाय केले जात आहेत. काही वेळा तर माणसाने यात क्रूरतेची परिसीमा गाठल्याचं दिसून येते. कर्नाटकात (Karnataka) नुकत्याच उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेतूनही मानवी निर्दयतेची साक्ष मिळत आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीत माकडांना (Monkeys) रामभक्त हनुमानाचे वंशज मानलं जातं. काही ठिकाणी त्यांची पूजाही केली जाते; पण कर्नाटकात एक, दोन नव्हे तर तब्बल 20 माकडांना मारून टाकल्याची भयंकर घटना घडली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत राज्यातली ही तिसरी घटना आहे.

हेही वाचा- व्यायाम करताना घडलं भलतंच; सांगलीत बड्या डॉक्टरचा जिममध्येच मृत्यू

 कोलार (Kolar) इथल्या बायपास रोडवरील आरएन जलप्पा हॉस्पिटलजवळ रस्त्यावर काही गोण्या पडल्या असल्याची माहिती बुधवारी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तिथं जाऊन गोण्या उघडून बघितल्या असता त्यात तब्बल 20 माकडांना कोंबण्यात आल्याचं दिसून आलं. त्यापैकी काही माकडं आधीच मृत झाली होती, तर काहींचे श्वास सुरू होते; पण नंतर त्यांचाही मृत्यू झाला. या सर्व माकडांना विष देऊन मारण्यात आल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी गुलपेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं कोलारचे पोलीस अधीक्षक डी. किशोर बाबू यांनी सांगितलं. कोलारचे उपायुक्त डॉ. सेल्वमनी आर. यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवून दोषींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करावी असंही सांगितलं आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांतली राज्यातली ही तिसरी घटना असून, 26 जुलै रोजी हसन जिल्ह्यातल्या (Hasan District) चौडेनहल्ली इथं 38 माकडं अशाच पद्धतीनं गोणीत मृतावस्थेत आढळली होती. त्या प्रकरणी एका महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली असल्याचं डॉ. सेल्वमनी आर. यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

हेही वाचा- भयंकर! किचनमध्ये बिबट्याला पाहून कुटुंबाला फुटला घाम, 6 तास चालला संघर्ष पण शेवटी...

9 सप्टेंबर रोजी शिवमोगा जिल्ह्यात कांबडाळ होसूर गावात 100पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांना (Stray Dogs) विष देऊन मारून टाकल्याचं (Poisonning) उघडकीस आलं होतं. ग्रामपंचायतीनं पंचायत हद्दीत असलेल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे आणि त्यांच्या निर्बिजीकरणाचे आदेश दिले होते आणि त्यासाठी खासगी ठेकेदारांना कंत्राट दिलं होतं; मात्र पंचायत समितीच्या सचिवांसह काही सदस्यांनी खासगी ठेकेदारांशी संगनमत करून कुत्र्यांना विष देऊन मारण्याचा कट रचला आणि 100 पेक्षा जास्त कुत्र्यांना विष देऊन ठार केलं, अशी माहिती भद्रावती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी कांबडाळ होसूर ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांसह 12 जणांना अटक केली आहे.

प्राण्यांवर केल्या जात असलेल्या अशा क्रूर कृत्यांचं प्रमाण वाढत असल्याबद्दल वन्यजीव कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपण जंगलांवर अतिक्रमण करत असल्यानं प्राणी शहराकडे येत आहेत, याकडे बेंगळुरूचे वन्यजीव कार्यकर्ते जोसेफ हूवर यांनी लक्ष वेधलं.

हेही वाचा- SHOCKING: पत्नीला द्यायचा ड्रग्ज, अनोळखी लोक करायचे बलात्कार; तब्बल 10 वर्षांनी गुन्हा उघडकीस

 ‘आयपीसीच्या (IPC) कलम 428 अन्वये, एखाद्या व्यक्तीनं दहा रुपये किमतीच्या पाळीव प्राण्याला ठार मारण्यासाठी किंवा अपंग केलं तर दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते. पाळीव प्राण्याची किंमत 50 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे; मात्र भटक्या प्राण्यांबाबत असा कोणताही नियम नाही. हे प्राणी कोणाच्याही मालकीचे नसतात, म्हणून त्यांना मालमत्ता मानली जात नाही आणि त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलं जात नाही, असं बेंगळुरूस्थित वकील रश्मी नायर यांनी सांगितलं. कायद्यातल्या पळवाटांमुळे अशा गुन्ह्यांना पाठबळ मिळत असल्याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन्यजीव कार्यकर्त्यांनी हा प्रश्न लावून धरला तर कदाचित या मुक्या जीवांना निर्दयपणे मारणाऱ्या लोकांना शिक्षा होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Karnataka