भयंकर! किचनमध्ये बिबट्याला पाहून कुटुंबाला फुटला घाम, 6 तास चालला संघर्ष पण शेवटी...

भयंकर! किचनमध्ये बिबट्याला पाहून कुटुंबाला फुटला घाम, 6 तास चालला संघर्ष पण शेवटी...

कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील तिलारीनगर येथील एका कुटुंबाच्या स्वयंपाक घरात बिबट्या शिरल्याची (leopard enters in kitchen) थरारक घटना समोर आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 01 ऑक्टोबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील तिलारीनगर येथील एका कुटुंबाच्या स्वयंपाक घरात बिबट्या शिरल्याची (leopard enters in kitchen) थरारक घटना समोर आली आहे. घरासमोर भाकरीचे तुकडे खाणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला (Leopard attack on dog) होता. अचानक झालेल्या हल्ल्यातून कुत्र्याने स्वत:ची सुटका करत स्वयंपाकघरात पळ काढला. पण कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्याही स्वयंपाक घरात शिरला. बिबट्याला स्वयंपाक घरात शिरल्याचं पाहून कुटुंबीयांना घामच फुटला होता. स्वयंपाकघरात शिरलेल्या बिबट्याने तब्बल सहा तास नागरिकांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं आहे.

संबंधित घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कळसगादे येथील बांदराई धनगरवाड्यात घडली आहे. मंगळवारी रात्री एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात याठिकाणी आला होता. दरम्यान रात्री नऊच्या सुमारास रामू लांबोर यांच्या घरासमोर त्यांचा पाळीव कुत्रा भाकरीचे तुकडे खात होता. यावेळी दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. पण कुत्र्याने बिबट्याच्या तावडीतून सुटका करत किचनमध्ये शिरला.

हेही वाचा-OMG! शीर धडावेगळं झालं तरी टुणटुण उड्या मारतं; बेडकाचा आश्चर्यकारक VIDEO VIRAL

कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्याही स्वयंपाक घरात शिरला. यावेळी लांबोर कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या किचनवर चढला. हीच संधी साधत लांबोर यांनी आपल्या सर्व कुटुंबाला तातडीने घराबाहेर काढलं आणि घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या थरारक घटनेनंतर लांबोर यांनी त्वरित या घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.

हेही वाचा-आकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध! खायचं सोडा, स्पर्शानेही जाईल जीव

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पण सहा तास चाललेल्या संघर्षानंतर, बिबट्या काळोख आणि धुक्याचा फायदा घेऊन पसार झाला. या घटनेनं गावात बराच वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. बिबट्या पळून गेल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Published by: News18 Desk
First published: October 1, 2021, 11:06 AM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या