पॅरिस, 30 सप्टेंबर : स्वतःच्या पत्नीला ड्रग्ज देऊन इतर पुरुषांना (Husband used to give drugs to wife and let others rape her) तिच्यावर बलात्कार करू देणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा नराधम (Strangers raped wife for 10 years) पती आपल्या पत्नीवर असा अत्याचार करत होता. दुसऱ्याच एका प्रकरणात पतीला अटक झाल्यानंतर पोलीस तपास करत असताना हा भयंकर प्रकार उघडकीला आला.
पत्नीवर अनोळखी लोकांकडून जबरदस्ती
फ्रान्समधील 68 वर्षाचा आरोपी स्वतःच्या पत्नीला ड्रग्ज देत असे. त्याच्या प्रभावाने पत्नी बेशुद्ध झाल्यावर तो अनोळखी लोकांकडून पैसे देऊन त्यांना स्वतःच्याच पत्नीवर बलात्कार करू देत असे. फ्रान्सच्या एविगनोन शहरात गेल्या 10 वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. पत्नीला ड्रग्जची नशा चढत असल्यामुळे तिला या घटना लक्षात राहत नसत. आपण बेशुद्ध झाल्यावर आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे पत्नीला आठवतही नसे. याचाच गैरफायदा घेत पतीने अनेकांकडून पैसे उकळले होते. 24 वर्षांपासून ते 71 वर्षांच्या आरोपीपर्यंत अनेक नराधमांनी महिलेवर अत्याचार केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्यावर त्यांनादेखील धक्का बसला.
असा उघड झाला गुन्हा
एका दुकानात महिलांच्या स्कर्टखाली कॅमेरा लावल्याप्रकरणी या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यानंतर आरोपीच्या पत्नीवर अऩेकांनी बलात्कार केल्याचे व्हिडिओ पोलिसांना मिळाले. एखाद्या बलात्काराच्या प्रकरणात पुरावे मिळत नाहीत, मात्र या प्रकरणात मुबलक पुरावे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून पत्नीवर होणाऱ्या जबरदस्तीचं व्हिडिओ शूटिंग या आरोपीनं करून ठेवलं होतं. त्याचा साठाच पोलिसांनी जप्त केला आहे.
हे वाचा - आधी इंजेक्शन देत बेशुद्ध केलं आणि मग गाडीत कोंबून गुरांची चोरी, घटनेचा VIDEO
पत्नीला बसला धक्का
आरोपीच्या पत्नीचं वय 60 वर्षं असून गेल्या दशकभरापासून तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची कल्पना पोलिसांनी तिला दिली. हे समजल्यावर महिलेला जबर मानसिक धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.