मुंबई, 14 जून : आयपीएलच्या पुढच्या 5 वर्षांसाठी टीव्ही आणि डिजीटल मीडिया राईट्स (IPL Media Rights) मिळवणाऱ्या कंपन्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) आणि आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती देण्यात आली आहे. 2023 ते 2027 या वर्षांसाठी स्टार स्पोर्ट्सला टीव्ही प्रसारणाचे तर व्हायकॉम 18 ला डिजीटल प्रसारणाचे अधिकार मिळाले आहेत. बीसीसीआयला मीडिया राईट्सच्या माध्यमातून 48 हजार 390 कोटी रुपये मिळाले आहेत. बीसीसीआयने (BCCI) मीडिया राईट्सच्या 4 कॅटेगरीसाठी रविवारपासून ई-ऑक्शनला सुरूवात केली. पहिल्या पॅकेजमध्ये भारतीय उपखंडासाठीचे टीव्ही राईट्स, दुसऱ्या पॅकेजमध्ये डिजीटल राईट्स, तिसऱ्या पॅकेजमध्ये ठराविक मॅचचे डिजीटल राईट्स आणि चौथ्या पॅकेजमध्ये भारतीय उपखंडाबाहेरच्या टीव्ही आणि डिजीटल प्रसारणाच्या अधिकारांचा समावेश होता.
Thank you, @StarSportsIndia for renewing the partnership!
— IndianPremierLeague (@IPL) June 14, 2022
Welcome on-board @viacom18 and @TimesInternet.
This is just the start of a promising 5-year journey. We can't wait to get going. #TATAIPL
बीसीसीआय पाच वर्षांमध्ये आयपीएलच्या 410 मॅचच्या आयोजनाची योजना आखत आहे. 2023-24 साली 74-74, 2025-26 साली 84-84 आणि 2027 साली 94 मॅचचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. आयपीएल 2022 मध्ये 8 ऐवजी 10 टीम मैदानात उतरल्या.
Viacom18 bags digital rights with its winning bid of Rs 23,758 cr. India has seen a digital revolution & the sector has endless potential. The digital landscape has changed the way cricket is watched. It has been a big factor in the growth of the game & the Digital India vision.
— Jay Shah (@JayShah) June 14, 2022
‘व्हायकॉम 18 ला 23,758 कोटींमध्ये डिजीटल राईट्स मिळाले आहेत. भारताने एक डिजीटल क्रांती बघितली आहे आणि या क्षेत्रामध्ये अनंत संभावना आहेत. डिजीटल मीडियाने क्रिकेट बघण्याची पद्धतच बदलली आहे. खेळाचा विकास आणि डिजीटल इंडिया व्हिजनसाठी हे एक मोठं पाऊल आहे. स्टार इंडियाला 23,577 कोटी रुपयांमध्ये टीव्ही राईट्स मिळाले आहेत,’ असं ट्वीट जय शाह यांनी केलं आहे. मागच्या वेळी स्टारने टीव्ही आणि डिजीटल राईट्ससाठी 16,348 कोटी रुपये दिले होते. यावेळी हीच किंमत जवळपास 3 पट वाढली आहे. डिसक्लेमर : नेटवर्क18 आणि टीव्ही18 चे संचालन इंडिपेन्डण्ट मीडिया ट्रस्टकडे आहे, ज्याचा रिलायन्स इंडस्ट्रीज एकमात्र लाभार्थी आहे.