मराठी बातम्या /बातम्या /देश /शिवजयंतीलाच राजधानी दिल्लीत शिवसेनेचे आक्रमक आंदोलन, केजरीवालांकडे केली ही मागणी

शिवजयंतीलाच राजधानी दिल्लीत शिवसेनेचे आक्रमक आंदोलन, केजरीवालांकडे केली ही मागणी

मोठ्या संख्येनं नाशिकवरून शिवसैनिक राजधानी दिल्ली येथे आले होते.

मोठ्या संख्येनं नाशिकवरून शिवसैनिक राजधानी दिल्ली येथे आले होते.

मोठ्या संख्येनं नाशिकवरून शिवसैनिक राजधानी दिल्ली येथे आले होते.

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिल्लीत मोठ्या संख्येनं नाशिकवरून शिवसैनिक आले होते. मात्र गेल्या वर्षभरापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून शिवसेनेने शिवाजी स्टेडियम या मेट्रो स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन करावं अशी केलेली मागणी अद्याप मान्य झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीत आंदोलन करण्यात आले.

दिल्लीतील ऐतिहासिक अशा कॅनॉट प्लेस परिसरात शिवाजी स्टेडियम हे मेट्रो स्टेशन आहे. या मेट्रो स्टेशनवरून एअरपोर्ट आणि नवी दिल्ली स्टेशनला जाण्याकरता मेट्रो आहेत. या मेट्रो स्टेशनला शिवाजी स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकार नगर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या मेट्रो स्टेशनचे नाव बदलावे यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. जवळपास वर्ष लोटल्यानंतरही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नाशिकवरून आलेल्या शिवसैनिकांनी शिवाजी स्टेडियम परिसरात जोरदार आंदोलन केले. सोबतच या शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचे नामकरण करून या मेट्रो स्टेशनच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन असा नामफलक देखील लावण्यात आला आहे.

हेही वाचा - 'अजितदादांनी कितीही मास्क आणि गॉगल लाऊ द्या, तरीही मी...', मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

यावेळी शिवसैनिकांनी जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. सोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठवण करून दिली की जर दिल्ली सरकारने शिवाजी स्टेडियमचे नाव बदलले नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. संपूर्ण विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने आणि गौरवाने घेतले जाते, अशा वेळी त्यांचा एकेरी उल्लेख करणे हे अपमानजनक आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Shiv jayanti, Shivsena