जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी! अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? ड्रोनमध्ये सापडले बॉम्ब

मोठी बातमी! अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? ड्रोनमध्ये सापडले बॉम्ब

मोठी बातमी! अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? ड्रोनमध्ये सापडले बॉम्ब

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की दहशतवादी यात्रेच्या बसेसवर हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर 29 मे : कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरात आज पहाटे पोलिसांनी पाडलेल्या ड्रोनमध्ये सात स्टिकी बॉम्ब सापडले आहेत (Seven Sticky Bombs Recovered from Drone). दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) लक्ष्य केलं जात आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की दहशतवादी यात्रेच्या बसेसवर हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय दुसऱ्या एका पॅकेटमध्ये सात UBGL (अंडर बॅरल ग्रेनेड) देखील आढळून आले आहेत.

भारताच्या 6 क्षेपणास्त्रांची देशात आणि जगात चर्चा, जी क्षणात करू शकतात शत्रूला उद्ध्वस्त

अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये संकरित दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत करून दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात आली आहे. या वर्षी सुमारे 87 दहशतवादी सुरक्षा दलांनी मारले आहेत.

News18

13 मे रोजी काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांची हत्या आणि त्यानंतर काश्मिरी अभिनेत्री अमरीन भट्टची हत्या यावरून जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण आधीच तणावाचं आहे. ते अधिक बिघडवण्यासाठी दहशतवादी टार्गेट किलिंगचा अवलंब करत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. स्थानिक लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. Super Cyclone: भारतासाठी अत्यंत घातक ठरु शकतात सुपर सायक्लॉन्स, संशोधकांनी दिला मोठा इशारा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबतच देशांतर्गत तयार केलेले संकरित दहशतवादी हे एक मोठं आव्हान बनलं आहे. ते वेगवेगळ्या मार्गाने हल्ले करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात