Home /News /national /

Super Cyclone: भारतासाठी अत्यंत घातक ठरु शकतात सुपर सायक्लॉन्स, संशोधकांनी दिला मोठा इशारा

Super Cyclone: भारतासाठी अत्यंत घातक ठरु शकतात सुपर सायक्लॉन्स, संशोधकांनी दिला मोठा इशारा

Super Cyclone: हवामानातल्या बदलांमुळे (Climate Change) संपूर्ण जगावरच परिणाम होत आहेत. हवामानचक्र बदलत आहे. त्याचा फटका अर्थातच माणसालाही बसत आहे. अचानक येणारी चक्रीवादळं, प्रचंड किंवा अवकाळी पाऊस, अति हिमवर्षाव किंवा अति दुष्काळ हे त्याचेच परिणाम आहेत.

पुढे वाचा ...
     मुंबई, 28 मे-   हवामानातल्या बदलांमुळे (Climate Change) संपूर्ण जगावरच परिणाम होत आहेत. हवामानचक्र बदलत आहे. त्याचा फटका अर्थातच माणसालाही बसत आहे. अचानक येणारी चक्रीवादळं, प्रचंड किंवा अवकाळी पाऊस, अति हिमवर्षाव किंवा अति दुष्काळ हे त्याचेच परिणाम आहेत. त्यातच आता वातावरणीय बदलामुळे तीव्र स्वरूपाची उष्णकटिबंधीय चक्रीवादळं (Tropical Storm) भारतासाठी अत्यंत घातक ठरू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ब्रिटनच्या ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे. 'जागरण'ने या संशोधनाबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे. ही उष्णकटिबंधिय वादळं भारतात खूप नुकसानकारक ठरू शकतात, असं या अभ्यासात म्हटलं आहे. क्लायमेट रेझिलिएन्स अँड सस्टेनेबिलिटी (Climate Resilience and Sustainability Journal) या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. घातक हरितगृह वायूंचं उत्सर्जन (Green House) होत राहिलं, तर 2020 च्या तुलनेत भारतात अडीच पट जास्त नागरिकांना पुराचा सामना करावा लागू शकतो. हवामानाच्या दृष्टीने दक्षिण आशिया (South Asia) सध्या सगळ्यांत जास्त संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे. आतापर्यंत या भागात सुपरसायक्लॉनमुळे लाखो नागरिकांचे जीव गेले आहेत, असं ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीमध्ये क्लायमेट सायन्सचे प्रोफेसर असलेले आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॅन मिशेल यांचं म्हणणं आहे. सध्याच्या परिस्थितीत या वादळांचा प्रभाव जाणून घेण्याच्या अभ्यासासाठी हवामानाच्या विशेष मॉडेलचा वापर करण्यात आला. वाढत्या तापमानामुळे सुपर सायक्लॉनची (Super Cyclone) संख्या वाढणार आहे, असा उल्लेख 'बांगलादेश युनिव्हर्सिटी ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी'मधील हायड्रॉलॉजीचे प्रोफेसर आणि या अभ्यासात सहभागी झालेले संशोधक सैफुल इस्लाम यांचं म्हणणं आहे. (हे वाचा:उष्णतेच्या लाटेच्या कहरासाठी कोण आहे जबाबदार? संशोधनातून कारण आलं समोर) वाढतं तापमान येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक घातक ठरत आहे. गेले काही दिवस भारत आणि त्याच्या जवळच्या देशांत सध्या जाणवणारी उष्णतेची तीव्र लाट त्याचाच एक भाग आहे. अति उष्णतेच्या बाबतीत (Extreme Heat) हवामानबदल हा मोठा गेमचेंजर ठरू शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. मानवाने केलेल्या घातक बदलांमुळे हवामानात बदल होत आहेत आणि त्यामुळे जवळपास प्रत्येक ठिकाणी उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि अन्य कारणांमुळे होणारे परिणाम भयंकररीत्या जाणवू लागले आहेत. हे टाळायचं असेल, तर आतापासूनच प्रयत्न करणं गरजेचं आहे.
    First published:

    Tags: Weather

    पुढील बातम्या