नवी दिल्ली 26 ऑगस्ट : काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप आणि टीकाही केली आहे. सोनिया- राहुल यांचं ‘मिशन काश्मीर’ फेल, गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा आझाद यांनी या पत्रामध्ये म्हटलं की ‘दुर्दैवाने राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि विशेषत: जानेवारी 2013 मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आधी अस्तित्वात असलेली संपूर्ण सल्लागार यंत्रणा त्यांनी उद्ध्वस्त केली. तसंच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केलं. सध्या राहुल गांधी हे अनुभन नसलेल्या लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेले आहेत.’ यासोबतच पुढे त्यांनी लिहिलं ‘राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी जारी केलेला अध्यादेश फाडून टाकणे हे त्यांची अपरिपक्वता दर्शवतं. यामुळे 2014 मध्ये पराभव पत्करावा लागला.’ काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केल्याबाबत आझाद यांनी लिहिलं आहे की, ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाने ‘काँग्रेस जोडो यात्रा’ करायला हवी होती. टीईटी घोटाळ्यात सत्तारांच्या मुलींवर आरोप नेमके काय? वाचा Exclusive रिपोर्ट काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र आहेत. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. यापेक्षा वाईत शब्दांत सांगायचं झालं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते, असा गंभीर आरोपही गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पत्रातून केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.