चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे : टीईटी परीक्षा घोटाळ्यात माझ्या मुलींचा काहीही संबंध नसून कुणीतरी त्यात ही नावं घुसडल्याचा आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार सतत्याने सांगत आहेत. पण परिक्षा परिषदेच्या महाटीईटी या शासकीय वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या यादीतच सत्तारांच्या मुलींची नावं आढळून आल्याने सगळंच पितळ उघडं पडलं आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात मंञी अब्दुल सत्तारांच्या दोन मुली अपाञ ठरल्याचं सगळेच जण सांगताहेत पण या घोटाळ्यात सत्तारांच्या मुलींवर नेमकं काय आरोप झालेत हे आजवर समोर आलं नव्हतं म्हणूनच न्यूज18 लोकमतने या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला असता मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांना आता बेकायदेशीर ठरवले आहे. टीईटी घोटाळ्यात सत्तारांच्या मुलींवर आरोप काय? टीईटी परीक्षा 2019 घोटाळ्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेकडून अपाञ परीक्षार्थींच्या एकूण 3 याद्या प्रसिध्द पहिली यादी 7500 अपाञ मुलांची यासर्वांवर पेपरमध्ये फेरफारीचा आरोप तर दुसरी यादी ही 293 जणांची… ‘परिशिष्ट ब’ च्या यादीत सत्तारांच्या मुलींचा समावेश ‘परिशिष्ट ब’ यादीतील मुलं ही नापास असूनही त्यांनी बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळवणाल्याचा आरोप! म्हणजेच TET 2019च्या परिक्षेत सत्तारांच्या मुली नापास झाल्या होत्या! तरीही त्यांनी एजंट करवी बनावट प्रमाणपत्र पञ मिळवल्याचा आरोप! एकूण 293 परिक्षार्थींनी तत्कालीन परीक्षा आयुक्त तुकाराम सुपेकडून ही बनावट प्रमाणपत्र मिळवली होती विशेष म्हणजे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या या 293 जणांचा परीक्षा परीषदेच्या अंतिम निकालात कुठेही समावेश नव्हता! आता एवढा ढळढळीत पुरावा शासकीय वेबसाइटवर उपलब्ध असतानाही मंञी अब्दुल सत्तार आपल्या मुलींवरील आरोप फेटाळत असतील तर याचा अर्थ असा होतो की, मंञ्यांच्याच आपल्या शासकीय यंञणेवर विश्वास नाही असंच म्हणावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.