मुंबई, २६ ऑगस्ट : देशातील राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलम नबी आझाद यांना राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे देशाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे जुने आणि जाणते जेष्ठ नेते आज काँग्रेस सोडून बाहेर पडत आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही कारणांवरून वादाचे प्रसंग ओढवले होते. त्यामुळे गुलाम नबी आझाद काहीसे नाराज देखील असल्याचं समजत आहे. काँग्रेसच्या प्रथमिक सदस्यत्वासह सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला. यामुळे सोनिया आणि राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. ते काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. काँग्रेसनं आज जुना आणि जाणता चेहरा गमवला. काँग्रेसची गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली पडझड असो किंवा अंतर्गत कलह असो वारंवार त्यांनी पत्राद्वारे सोनिया गांधी यांना सांगितलं होतं. काँग्रेसला एक कायम स्वरुपी अध्यक्ष असावा, संघटनेला बळ द्यावं असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. मात्र त्यांच्या या मुद्द्यांची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही.
Congress leader Ghulam Nabi Azad resigns from all positions including primary membership of Congress Party pic.twitter.com/hOFp1FQkCj
— ANI (@ANI) August 26, 2022
या सगळ्या नाराजीतून गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर आता काँग्रेसमध्ये आणखी काही राजीनामे पडणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू असताना गुलाम नबी आझाद यांनी दिलेला हा राजीनामा खळबळजनक आहे. त्यांच्यासोबत आणखी काही राजीनामे देणार का याची देखील चर्चा होत आहेत. दुसऱ्या कुठल्याही पक्षात ते जाणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाकडून आता त्यांची समजून काढली जाणार का? त्यांना पुन्हा बोलावलं जाणार का? त्यांची मनधरणी कशी करणार याकडे लक्ष लागलं आहे.