जाहिरात
मराठी बातम्या / देश / ओवैसींवर भडकले उर्दू कवी, म्हणाले.. ते दुसरे जिनाच, मुस्लिमांची मतं विभागतात

ओवैसींवर भडकले उर्दू कवी, म्हणाले.. ते दुसरे जिनाच, मुस्लिमांची मतं विभागतात

ओवैसींवर भडकले उर्दू कवी, म्हणाले.. ते दुसरे जिनाच, मुस्लिमांची मतं विभागतात

‘ओवैसी हे भाजपचे दलाल असून नेहमीच मुस्लिमांच्या मतांचं विभाजन करण्याचं काम करतात.’

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 13 नोव्हेंबर: फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून (France Terrorist Attack) तिखट वक्तव्य करणारे उर्दू कवी मुनव्वर राणा आता थेट एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींवर (Aimim chief Asaduddin Owaisi) भडकले आहेत. राणा यांनी ओवैसींची तुलना थेट मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांच्याशी केली आहे. अशा नेत्यांनीच मुस्लिमांना विभागलं असून त्यांना नष्ट केलं आहे. जिना यांच्यानंतर मुस्लिम समाज आता भारतात असा आणखी एक नेता निर्माण होऊ देणार नाही, असा इशारा देखील मुनव्वर राणा यांनी दिला आहे. ओवेसी हे भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी केला आहे. हेही वाचा… ऐन दिवाळीत ऋषिकेशवर शोककळा! LOC वर पाकशी लढताना BSF चे अधिकारी राकेश डोवाल शहीद बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर मुनव्वर राणा यांनी पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ओवेसी मुस्लिमांची मत विभागतात ज्याचा फायदा भाजपला होतो. बिहारमध्ये हेच झालं. एमआयएमनं 5 जागा जिंकल्या. त्याचा फायदा भाजपला झाला आणि नुकसान महागठबंधनचं झालं. ओवैसींना संबोधलं भाजपाचं दलाल… ओवैसी हे भाजपचे दलाल असून नेहमीच मुस्लिमांच्या मतांचं विभाजन करण्याचं काम करतात. असदुद्दीन आणि अकबरुद्दीन हे दोघे भाऊ माझ्या मते गुंड आहेत. ओवैसींची मेडिकल कॉलेज, जमिनी आणि अनेक उद्योग आहेत. मुस्लिमांना आणि खासकरुन तरुणाईला भरकवटण्याचं ते काम करतात, असा गंभीर आरोप देखील मुनव्वर राणा यांनी केला. आपली 15 हजार कोटींची संपत्ती वाचवण्यासाठी ते मुस्लिमांच्या मतांचं विभाजन करुन ते थेट भाजपला मदत करतात, असंही त्यांनी सांगितलं. मुस्लिमांना कोणता न्याय देणार आहेत? असदुद्दीन ओवैसी यांच्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार फायद्याची ठिकाणं आहेत. उत्तर प्रदेशात जातीय तणाव निर्माण होतो तेव्हा मात्र ओवैसी हैदराबादेत लपतात, असा आरोप मुनव्वर राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये 5 जागा जिंकून ते मुस्लिमांना कोणता न्याय देणार आहेत?, असा सवालही राणा यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा… चिरंजीवीला कोरोनाने चकवलं! 3 दिवसांत रिपोर्ट आला Covid Negative, चाचणीच होती चुक बिहारनंतर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचं विभाजन करण्याचा ओवैसींचा प्लान आहे. तर दुसरीकडे, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगाली हिंदू मतांचं विभाजन करणार आहेत, असा गौप्यस्फोट मुनव्वर राणा यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात